Coronavirus: अहमदनगरमधील आणखी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील रुग्णांची संख्या 48 वर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 13:11 IST2020-03-19T12:48:43+5:302020-03-19T13:11:19+5:30
कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या आता दोन झाली आहे.

Coronavirus: अहमदनगरमधील आणखी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह; राज्यातील रुग्णांची संख्या 48 वर
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरुवारी दुपारी पत्रकारांना दिली. हा पॉझिटिव्ह रुग्ण हा जिल्ह्यातील एका तालुक्यातील असून कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या आता दोन झाली आहे.
जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत ६३ संशयितांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी गत आठवड्यात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता. आता हा दुसरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हा रुग्ण दुबई येथून ३ मार्चला नगरमध्ये आला होता. जिल्हा रुग्णालयात त्याची तपासणीही करण्यात आली होती. त्याच्याही घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. त्याच्यावर प्रशासनाने वॉच ठेवला होता. मात्र त्या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याला बुथ हॉस्पिटलमधील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आला आहे. सदरचा रुग्ण हा जिल्ह्यातील एका तालुका ठिकाणचा आहे. आतापर्यंत ६३ जणांचे नमुने पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोन पॉझिटिव्ह, पाच जणांचे अहवाल अद्याप आले नसून उर्वरीत निगेटिव्ह आहेत.