दुसरा बिबट्याही पिंजऱ्यात
By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-13T23:25:39+5:302014-06-14T01:19:29+5:30
अकोले : रुंभोडी-इंदोरी-मेहेंदुरी परिसरात धुमाकूळ घालणारा दुसरा बिबट्या आज शुक्रवारी पहाटे मेहेंदुरीतील हाडोळा शिवारातच पिंजऱ्यात अडकला
दुसरा बिबट्याही पिंजऱ्यात
अकोले : रुंभोडी-इंदोरी-मेहेंदुरी परिसरात धुमाकूळ घालणारा दुसरा बिबट्या आज शुक्रवारी पहाटे मेहेंदुरीतील हाडोळा शिवारातच पिंजऱ्यात अडकला असून त्यालाही सुगाव रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. दोन्ही बिबटे शेजारी शेजारी पिंजऱ्यात ठेवण्यात आले असून सरकारी पाहूणचार घेत आहे. पिंजऱ्याला धडकामारल्याने दोन्ही बिबटे जखमी झाले आहे.
चार किलोमिटरच्या चौरस क्षेञातील आठ दिवसात दोन चिमुरड्यांसह चौघे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहे. बुधवारी पहाटे मेहेन्दुरीतील हाडकी शिवारात बिबट्या जेरबंद झाला तर याच शिवारात आनखी एक बिबट्या आज पहाटे (शुक्रवार) पिंजऱ्यात अडकला. दोन्हींना सुगाव रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. बिबट्यांना पाहण्यासाठी गदीर होत असून चेकाळलेले बिबट पिंजऱ्याला धडक मारत आहेत. त्यामुळे ते जखमी झाले आहे. एक मादी व दुसरे तिचा बछडा असण्याची शक्यता आहे. बिबट्या स्वाभाविक भिञा असून त्याल लपायला जागा नसल्यामुळे तो मानवीवस्ती जवळच ऊस क्षेञात आश्रयाला आढळतो. दहा विस किलोमिटरच्या परिसरातून तो दुर जात नाही.
बिबट्याला मांजरा सारखे दुर नेऊन सोडले तरी तो पुन्हा मुय जागी आश्रयास येतो. माञ फार दुरवर नेऊन सोडल्यास तो त्या भागातच रमण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजूनही दोन- तिन बिबटे व बछडे परिसरात असण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहे.
मानवीवस्तीत बिबट्यांचा वावर वाढला असून राञीच्या वेळी शेतकरी शेतात पाणी भरायला जाण्यास धजावत नाहीत इतकी बिबट्याची दहशत पसरली आहे. सुगाव रोपवाटिकेतील बिबटे लवकरच पांगरी रोपवाटीकेत हलविण्याची शक्यता असून त्यानंतर त्यांना माणिकडोह ता.जुन्नर येथील निवारा केंद्रात पाठविण्यात येणार आहे.