नगर जिल्ह्यात आणखी १५ व्यक्ती झाल्या कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 11:50 IST2020-06-08T11:49:47+5:302020-06-08T11:50:23+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील १५ व्यक्ती सोमवारी (दि.८ जून) कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यात तपासणी करून १३ जणांना बुथ हाॉस्पिटलमधून तर दोन जणांना लोणी येथून आज डिस्चार्ज देण्यात आला. 

Another 15 persons were released from coronation in Nagar district | नगर जिल्ह्यात आणखी १५ व्यक्ती झाल्या कोरोनामुक्त

नगर जिल्ह्यात आणखी १५ व्यक्ती झाल्या कोरोनामुक्त

अहमदनगर: जिल्ह्यातील १५ व्यक्ती सोमवारी (दि.८ जून) कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यात तपासणी करून १३ जणांना बुथ हाॉस्पिटलमधून तर दोन जणांना लोणी येथून आज डिस्चार्ज देण्यात आला. 

 सोमवारी कोरोनामुक्त झालेल्यामध्ये राहाता तालुक्यातील २, संगमनेर ६,  शेवगाव १, कर्जत - २, अकोले २, नगर शहर १, पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील १३६ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

रविवारीही बारा जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे दोन दिवसात तब्बल २७ जणांना घरी सोडण्यात आले.  बरे होणा-यांची संख्या नव्या बाधितापेक्षा जास्त असल्याने प्रशासनानेही निश्वास टाकला आहे. 

Web Title: Another 15 persons were released from coronation in Nagar district