मुस्लीम जमात ट्रस्टची कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:25 IST2021-08-24T04:25:27+5:302021-08-24T04:25:27+5:30
कुरकुंडी गावातील मुस्लीम समाजातील नागरिकांनी एकत्र येत बैठक घेतली. या बैठकीचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौगुले यांनी केले. यावेळी ...

मुस्लीम जमात ट्रस्टची कार्यकारिणी जाहीर
कुरकुंडी गावातील मुस्लीम समाजातील नागरिकांनी एकत्र येत बैठक घेतली. या बैठकीचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौगुले यांनी केले. यावेळी सर्वांनी एकोप्याने राहणे व असलेल्या समस्या सामोपचाराने सोडविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान, मुस्लीम जमात ट्रस्टची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. सर्वानुमते मुस्लीम ट्रस्टच्या अध्यक्षपदी अश्पाक पटेल यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी आसिफ पठाण, सचिवपदी रशीद चौगुले, खजिनदारपदी तौसिफ पटेल, उपसचिवपदी खुद्दबुदीन पठाण आणि सदस्यपदी मजुभाई पठाण, आश्पाक पठाण, पप्पू चौगुले, आजित पठाण, रशीद पठाण, रफिक पटेल यांची निवड करण्यात आली. यावेळी नजिर शेख, रहीमान पठाण, आरिफ पठाण, हुसेन पठाण, बाबा चौगुले, जावेद शेख, अब्दुल करीम सय्यद इम्रान शेख, शबीर पटेल, आब्बास पटेल, रफिक पठाण, उस्मान पटेल, जाकीर पटेल, जाकीर पठाण आदी उपस्थित होते.