जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अनभुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:04+5:302021-07-02T04:15:04+5:30

अहमदनगर : शिवसेनेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी घुमरी (ता. कर्जत) येथील निष्ठावान तरुण सामाजिक कार्यकर्ता प्रवीण दत्तात्रय अनभुले यांची निवड ...

Anbhule as the district publicity chief | जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अनभुले

जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी अनभुले

अहमदनगर : शिवसेनेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी घुमरी (ता. कर्जत) येथील निष्ठावान तरुण सामाजिक कार्यकर्ता प्रवीण दत्तात्रय अनभुले यांची निवड करण्यात आली. कृषी मंत्री दादाजी भुसे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते अनभुले यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनी अनभुले यांची निवड केली. सोनई (ता. नेवासा) येथे २८ जून रोजी झालेल्या शिवसंवाद कार्यक्रमात अनभुले यांना निवडीचे पत्र मंत्री भुसे व गडाख यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

विद्यार्थी दशेपासून अनभुले हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. म्हणूनच दळवी यांनी त्यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड केल्याचे सांगितले.

शिवसेनेने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या पदावर संधी देत त्यांना ताकद दिली. सामान्यांच्या नेतृत्वाला झळाळी दिली. शिवसेनेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी सर्वसामान्य तरुण कार्यकर्ता म्हणून मला संधी दिली आहे. जिल्हाप्रमुख दळवी यांच्यासह सर्व वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवून मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली. आता अधिक जबाबदारीने काम करणार असल्याचे अनभुले यांनी सांगितले.

.............

०१ प्रवीण अनभुले

Web Title: Anbhule as the district publicity chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.