आनंदऋषिजींच्या जन्मोत्सवास प्रारंभ
By Admin | Updated: July 27, 2014 01:08 IST2014-07-26T23:24:28+5:302014-07-27T01:08:54+5:30
पाथर्डी : राष्ट्रसंत आनंदऋषिजी महाराज यांच्या ११४ व्या जन्मोत्सवास शनिवारपासून प्रारंभ झाला असून या पार्श्वभूमीवर पाथर्डी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा सुमारे पाच तास चालली.
आनंदऋषिजींच्या जन्मोत्सवास प्रारंभ
पाथर्डी : राष्ट्रसंत आनंदऋषिजी महाराज यांच्या ११४ व्या जन्मोत्सवास शनिवारपासून प्रारंभ झाला असून या पार्श्वभूमीवर पाथर्डी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा सुमारे पाच तास चालली. जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा रविवारी सकाळी आनंदऋषिजींचे जन्मगाव असलेल्या श्री क्षेत्र चिचोंडी येथे होणार आहे.
श्री तिलोक जैन विद्यालयाच्या विद्यार्थीनींचे लेझीम पथक, श्री आनंद महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे ढोल पथक शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले. सकाळी जैन स्थानकापासून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यानी पायी दिंडी काढली.
तालुक्यातील माणिकदौडी गावापासून रथाला सुरवात झाली. दुपारी शनी मंदिरापासून शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रेत कलश घेतलेल्या मुली, टाळ, ढोल, टिपरी, पथक, लेझीम आदी पथके सहभागी झाली होती. शोभायात्रा सुमारे अर्धा कि.मी. अंतराची होती.
शोभायात्रेत नगराध्यक्ष राजेंद्र उदमले, श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी, सचिव सतीश गुगळे, सहसचिव सुरेश कुचेरिया, ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, माजी नगरसेवक बंडू पा.बोरूडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मधुकर काटे, बाळासाहेब बोरूडे, नगरसेविका सुरेखा गोरे, माधवबाबा तसेच शहरातील जैन बांधव व इतर मान्यवर सहभागी झाले होते. सकाळी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या पायी दिंडीचे तालुक्यातील तिसगाव येथे स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते काशीनाथ लवांडे, मुक्ताजी भगत,विक्रम ससाणे, सुनील पुंड आदी हजर होते. (तालुका प्रतिनिधी)
ंआचार्यांचा जयघोष
‘आचार्य सम्राट आनंदऋंिषजी महाराज की जय, ‘जय आनंद जय आनंद’ आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.