भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवर नगरमधील एकाने केली आक्षेपार्ह कमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 15:38 IST2022-09-13T15:38:27+5:302022-09-13T15:38:55+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवर नगर तालुक्यातील संदीप खामकर या तरुणाने अपशब्द वापरले

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवर नगरमधील एकाने केली आक्षेपार्ह कमेंट
आण्णा नवथर
अहमदनगर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवर नगर तालुक्यातील संदीप खामकर या तरुणाने अपशब्द वापरले असून, संबंधिता विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अहमदनगर शहर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल नगरमधील संदीप खामकर या व्यक्तीने प्रसिद्धीसाठी पातळी सोडून टीकाटिप्पणी केली असून, ही बाब नंदनीय आहे. याबाबत संबंधित व्यक्ती विरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा.