भाजपच्या विद्यमान सहा आमदारांच्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 13:53 IST2019-09-04T13:53:22+5:302019-09-04T13:53:53+5:30
नगर जिल्ह्यातील भाजपच्या विद्यमान सहा आमदारांनी मुलाखती दिल्या. या मुलाखतीनंतर आता विधानसभानिहाय मुलाखती सुरू आहेत.

भाजपच्या विद्यमान सहा आमदारांच्या मुलाखती
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी येथील एका हॉटेलात भाजपच्या मुलाखती सुरू आहेत. या नगर जिल्ह्यातील भाजपच्या विद्यमान सहा आमदारांनी मुलाखती दिल्या. या मुलाखतीनंतर आता विधानसभानिहाय मुलाखती सुरू आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी भाजपाच्या कोअर कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन केले होते. यात भाजपच्या प्रा. राम शिंदे, स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, मोनिका राजळे, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे या विद्यमान आमदारांचा समावेश होता.
आमदारानंतर अकोले तालुक्यातील भाजपचे नेते अशोक भांगरे यांनी आपल्या सौभाग्यवतीसह मुलाखत दिली. संगमनेर तालुक्यातून विक्रम खताळ यांनी मुलाखत दिली आहे. मुलाखतीसाठी सर्वच मतदारसंघातून इच्छुकांनी गर्दी केली होती.