शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

Amit Shah In Ahmednagar: सहकार चळवळीसाठी आता समित्यांच्या भानगडीत पडणार नाही, अमित शाह यांनी सांगितला प्लान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 16:03 IST

देशाचे सहकारमंत्री अमित शाह यांनी आज अहमदनगरमधील प्रवरानगर येथे पहिल्यावहिल्या सहकार परिषदेला उपस्थिती लावली. यावेळी अमित शाह यांनी उपस्थितींना संबोधित करताना सहकार क्षेत्राला वाचवण्यासाठी नेमकं काय करता येईल याचा सविस्तर प्लान सांगितला.

अहमदनगर-

देशाचे सहकारमंत्री अमित शाह यांनी आज अहमदनगरमधील प्रवरानगर येथे पहिल्यावहिल्या सहकार परिषदेला उपस्थिती लावली. यावेळी अमित शाह यांनी उपस्थितींना संबोधित करताना सहकार क्षेत्राला वाचवण्यासाठी नेमकं काय करता येईल याचा सविस्तर प्लान सांगितला. "मी काही समिती वगैरे स्थापन करत बसणार नाही. आजवर भरपूर समित्या नेमल्या गेल्या आणि त्यांचे अहवाल धूळखात पडून राहिले. पण त्यावर काहीच झालं नाही. त्यामुळे सहकार चळवळ वाचवण्यासाठी आम्ही कोणत्याही समित्या स्थापन करत बसणार नाही. मी स्वत: या क्षेत्रातील विद्वान मंडळींसोबत बसून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे", असं अमित शाह यांनी म्हटलं. 

"सहकार क्षेत्राला काळानुरुप अनुकूल बनवावं लागेल. त्यासाठी जे काही बदल करावे लागतील ते केले जातील. सहकारी कारखान्यांचं खासगीकरण करुन चळवळ संपुष्टात आणण्याचं काम केलं जात आहे. पण ज्या प्रवरानगरमध्ये देशातील पहिल्यावहिल्या सहकारी कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली तो कारखाना आजही सहकारी पद्धतीनं चालतो आहे हे आनंद देणारं आहे. सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी आम्हाला हा कारखाना प्रेरणास्त्रोत म्हणून काम करेल. प्रवरानगरची ही जमीन सहकार क्षेत्राची काशी आहे", असं अमित शाह म्हणाले. 

सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून रणनिती आखली जाईल आणि आम्ही यासाठी समित्या स्थापन करणार नाहीत तर सहकार क्षेत्राचा अनुभव असलेल्या विद्वानांसोबत काम करू. वित्त, साखर कारखाने, मार्केटिंग, दूध इत्यादी सर्वच क्षेत्रांसाठी रणनिती लागू असेल, असंही अमित शाह म्हणाले. 

सहकार क्षेत्रासाठी विद्यापीठ देखील आणणारदेशात लवकरच सहकार विद्यापीठाचा स्थापन केली जाणार असल्याचंही अमित शाह यांनी यावेळी सांगितलं. तसंच मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह कायदा देखील बदलणार असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रातील सहकाराची चळवळ मजबूत आहे. तिची मुळंही खोलवर रुजलेली आहे. त्यामुळेच हे ठिकाण सहकार क्षेत्रातील काशी तीर्थक्षेत्रासारखं आहे असं मी पुन्हा एकदा आवर्जून नमूद करेन. सहकार क्षेत्रातील प्रत्येकानं या पवित्रा भूमीवर एकदा तरी भेट द्यायला हवी, असं अमित शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाAhmednagarअहमदनगर