आंबी खालसा ते  कोठे खुर्द रस्त्यावर दरड कोसळली  मोठे-मोठे दगड रस्त्यावर ; सुदैवाने जीवितहानी नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 11:44 IST2021-07-18T11:44:03+5:302021-07-18T11:44:29+5:30

घारगाव : गेल्या काही दिवसांपासून पठारभागात  कमी-जास्त प्रमाणात होत असलेल्या पावसाने संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुकच्या भानुशी मळा येथे आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यावर रविवारी पहाटेच्या वेळी दरड कोसळली.

From Ambi Khalsa to Khurd road, huge stones fell on the road; Fortunately no casualties | आंबी खालसा ते  कोठे खुर्द रस्त्यावर दरड कोसळली  मोठे-मोठे दगड रस्त्यावर ; सुदैवाने जीवितहानी नाही 

आंबी खालसा ते  कोठे खुर्द रस्त्यावर दरड कोसळली  मोठे-मोठे दगड रस्त्यावर ; सुदैवाने जीवितहानी नाही 


घारगाव : गेल्या काही दिवसांपासून पठारभागात  कमी-जास्त प्रमाणात होत असलेल्या पावसाने संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुकच्या भानुशी मळा येथे आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यावर रविवारी पहाटेच्या वेळी दरड कोसळली.

 

यात मोठे मोठे दगड रस्त्यावर आले असून वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. याबाबत कॉंग्रेसचे गटनेते व जिल्हा परिषद सदस्य यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले असल्याचे सांगितले.
         पठारभागात अधूनमधून कमी-जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यालगत डोंगररांगा आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास येथील भानुशीमळा परिसरातील रस्त्यालगतच्या डोंगराचे दगड सुटे झाल्याने घरंगळत येऊन रस्त्यावर पडले. दगड मोठे असल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला. सुदैवाने कोणतेही वाहन तेथून जात नव्हते. या रस्त्यालगतच्या खालच्या बाजूला लोकवस्ती आहे. हे दगड रस्त्यावरच अडकल्याने ते लोकवस्तीकडे सरकले नाही. यामुळे मोठी जीवितहानी टळली. 
      याबाबतची माहिती कॉंग्रेसचे गटनेते व जिल्हा परिषद सदस्य यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कडाळे यांनी घटनास्थळी टीम पाठवणार असल्याचे सांगितले.

Web Title: From Ambi Khalsa to Khurd road, huge stones fell on the road; Fortunately no casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.