आज साई प्रसादालयात भाविकांना आमरसाची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 13:26 IST2019-06-02T11:22:02+5:302019-06-02T13:26:35+5:30

साई संस्थानच्या प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी देण्यात येत आहे.

Amarsa party in Sai Prasad | आज साई प्रसादालयात भाविकांना आमरसाची मेजवानी

आज साई प्रसादालयात भाविकांना आमरसाची मेजवानी

शिर्डी : साई संस्थानच्या प्रसादालयात आज भाविकांना आमरसाची मेजवानी देण्यात येत आहे. शिरूर येथील भाविक दीपक नारायण करगळ यांच्या देणगीतून भाविक आमरसाचा स्वाद घेणार असल्याचे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.
आमरस भोजनासाठी करगळ यांनी तब्बल सात हजार सातशे चाळीस किलो केशर आंबा साइबाबा चरणी अर्पण केला आहे. आज संस्थान भोजनालयात किमान चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविक आमरसाचा स्वाद घेतील. उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, अंदाज प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात यासाठी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Amarsa party in Sai Prasad