अत्यावश्यक सेवेसह इतर दुकानांनाही परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:50+5:302021-06-05T04:15:50+5:30
श्रीगोंदा : कोरोना काळातील लाॅकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक सेवा, शेतीशी निगडित दुकानांप्रमाणेच टेलर, हेअर ...

अत्यावश्यक सेवेसह इतर दुकानांनाही परवानगी द्या
श्रीगोंदा : कोरोना काळातील लाॅकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक सेवा, शेतीशी निगडित दुकानांप्रमाणेच टेलर, हेअर सलून आदी इतर व्यावसायिकांनाही सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी श्रीगोंदा तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार यांना गुरुवारी याबाबतचे निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस दरात भरमसाठ वाढ केली आहे. याबाबत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. कोरोनाची लाट ओसरली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांसह सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दीपक भोसले, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, स्मितल वाबळे, बाळाप्पा पाचपुते, राजाभाऊ लोखंडे, समीर बोरा, प्रशांत गोरे, गणेश भोस, सतीश मखरे, निसार बेपारी, संतोष कोथिंबिरे आदी उपस्थित होते.
---
०४ श्रीगोंदा निवेदन
श्रीगोंदा तहसील कार्यालयात प्रांताधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार यांना निवेदन देताना राजेंद्र नागवडे, दीपक भोसले, मनोहर पोटे व इतर.