उपायुक्तांना नव्याने विभागांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:38 IST2021-02-06T04:38:09+5:302021-02-06T04:38:09+5:30
अहमदनगर : महापालिकेतील दोन्ही उपायुक्तांना नव्याने विभागांचे वाटप करण्यात आले असून, आस्थापनाप्रमुखपदी ए.डी. साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

उपायुक्तांना नव्याने विभागांचे वाटप
अहमदनगर : महापालिकेतील दोन्ही उपायुक्तांना नव्याने विभागांचे वाटप करण्यात आले असून, आस्थापनाप्रमुखपदी ए.डी. साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा आयुक्त राजेंद्र भोसले यांनी याबाबत नुकताच आदेश जारी केला आहे.
महाालिकेच्या उपायुक्तपदी यशवंत डांगे हे पदोन्नतीने नुकतेच रुजू झाले आहेत. उपायुक्त सु.मो. पवार यांची कल्याण-डोंबिवली महापालिकेत बदली झाली. तेव्हापासून उपायुक्त कर हे पद रिक्त होते. दरम्यान,संतोष लांडगे व एस.बी. लांडगे हे सहायक आयुक्त म्हणून रुजू झाले. तसेच सचिन राऊत हेही सहायक आयुक्त म्हणून रुजू झाल्याने या तिघांकडे उपायुक्त विभागाचा तात्पुरता पदभार सोपविण्यात आला होता. त्यांच्याकडील सर्व विभाग उपायुक्त डांगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कर व सामान्य प्रशासन, असे दोन उपायुक्त सध्या कार्यरत आहेत. या दोन्ही उपायुुक्तांना नव्याने विभागांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच उपायुक्त प्रदीप पटारे यांना सहायक म्हणून सहायक आयुक्त संतोष लांडगे तर, डांगे यांना सहायक म्हणून सिनारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
आस्थापनाप्रमुख म्हणून मेहर लहारे हे कामकाज पाहत होते. परंतु, त्यांच्याबाबत तक्रारी झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. नव्याने कामकाजवाटप करताना लहारे यांच्याकडे उद्यान विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्या जागी आस्थापना विभागप्रमुख म्हणून साबळे यांची नेमणूक करण्यात आली आहे. बांधकाम विभागाचे अधीक्षक ए.डी. सोनवणे यांची नियुक्ती शहर प्रभाग समिती कार्यालयात करण्यात आली आहे.
.....
असे आहे विभागांचे वाटप
उपायुक्त प्रदीप पठारे- सामान्य प्रशासन, आस्थापना, विधी, कामगार, नगरसचिव, संगणक, ग्रंथालय, माहिती व सुविधा केंद्र, प्रभाग समिती कार्यालये, लेखापरीक्षण, सुरक्षा, बांधकाम व प्रकल्प, पर्यावरण, नगररचना, अतिक्रमण, मुख्य लेखा व वित्त.
....
उपायुक्त यशवंत डांगे- भांडार, क्रीडा व सांस्कृतिक, शिक्षण, मूल्य करनिर्धारण, महिला व बालकल्याण, आधार प्रकल्प, माहिती व जनसंपर्क, अभिलेख कक्ष, आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन, रुग्णालये व आरोग्य सेवा, रक्तपेढी, अग्निशमन, मलेरिया, कुटुंब कल्याण माताबाल संगोपन, उद्यान, यांत्रिकी, निवडणूक, विद्युत, पाणीपुरवठा.