शहरं
Join us  
Trending Stories
1
सासाराम स्टेशनवर 'बर्निंग ट्रेन'चा थरार! पाटणा पॅसेंजरला लागली भीषण आग, एक बोगी जळून खाक
2
Top Marathi News LIVE: आठवड्याची सुरुवात शेअर बाजारातील घटांगळीने, सेन्सेक्स ८१४ अंकांनी घसरला
3
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
4
Earthquake In china : चीनमध्ये ५.२ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप! भीषण हादऱ्यांनी इमारती जमीनदोस्त, दोघांचा मृत्यू
5
'लग्नात स्कॉर्पिओ दिली, आता फॉर्च्युनर मागत होते'; सासरच्यांचा जाच! लग्नाच्या १४ महिन्यातच दीपिकाने संपवलं आयुष्य
6
Crime News: रेल्वेत सापडलेली पत्र्याची पेटी उघडताच दिसला तरुणीचा शीर नसलेला मृतदेह, अनेक तुकडे; रेल्वे स्थानकात खळबळ
7
NEET Paper Leak : पेपर विकणारेच नाही तर, लाखो रुपये खर्च करून विकत घेणारे पालकही सीबीआयच्या निशाण्यावर!
8
बापरे! मेक्सिकोमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ६ पुरुष आणि एका लहान मुलासह १० जणांचा मृत्यू
9
प्रीती झिंटा-श्रेयस अय्यर यांच्यात गंभीर चर्चा; पाँटिंगही हताश! PBKS च्या ताफ्यात नेमकं काय घडलं?
10
LPG Gas Crisis : एलपीजी सिलिंडरची परिस्थिती तशीच राहणार का? पुरवठा आणि दरांबाबत आली सर्वात मोठी अपडेट
11
अभिमानास्पद! कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक-निवेदिता सराफ यांनी जपली मराठी संस्कृती, अशोकमामांच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं
12
थेट टीव्ही स्टुडिओत एके-४७ ने गोळीबार! इराणच्या वृत्तवाहिनीवर थरार; 'युएई'च्या झेंड्यावर केला गोळीबार
13
​अमरावती हादरली! जुन्या वादातून तेजसची सपासप वार करत हत्या; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना २ तासांत बेड्या
14
आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?
15
दरवाढीनंतर आज किती रुपयांना मिळतंय पेट्रोल-डिझेल? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
16
"लवकर निर्णय घ्या, नाहीतर काहीच शिल्लक राहणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी
17
पेट्रोल-डिझेल खिसा कापणार?- आकड्यांचं गणित पाहा!
18
कसली आलीय मंदी... कोल्हापुरात जावयाच्या चप्पलसाठी वापरली चक्क दीड किलोची चांदी
19
मान्सून उंबरठ्यावर तरी महाराष्ट्र अजून तापलेलाच! १५ शहरांत पारा ४० पार
20
'केमिस्ट्री'च्या गुणांचे भाकीत नडणार; क्लासेस, पालक, विद्यार्थीही रडारवर!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शिक्षा, एनआरएचएम योजना अडचणीत

By admin | Updated: September 25, 2014 00:52 IST

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा अर्थसंकल्पात मंजूर झालेला निधी केंद्र सरकारने वितरित केलेला नाही.

ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर
अर्धे आर्थिक वर्ष संपत आले तरी सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा (एनआरएचएम) अर्थसंकल्पात मंजूर झालेला निधी केंद्र सरकारने वितरित केलेला नाही. त्यामुळे या योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत. केंद्रातील मोदी सरकारमुळेच निधी वितरणास उशीर होत असल्याचे बोलले जात आहे.
केंद्र सरकार जिल्हा परिषदेमार्फत शिक्षण, आरोग्य आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत अनेक योजना राबवते. त्यासाठी केंद्राकडून स्वतंत्रपणे निधी मंजूर होऊन त्याचे वितरण करण्यात येते. प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सर्व शिक्षा अभियान, आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत बीआरजीएफ यांचा समावेश आहे. साधारण दर वर्षी जानेवारी महिन्यांत या योजनांचे बजेट तयार करून ते मुंबईला पाठविण्यात येते. राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचा एकत्रित निधीचा प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येतो.
यंदाही राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाने जानेवारीत अभियानाचे बजेट तयार करून ते मुंबईला संचालकांकडे मंजुरीसाठी पाठविले. नगरसाठी ८३ कोटी रुपयांचे बजेट होते. यात माता बालसंगोपन, विविध लसीकरण, बांधकाम, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार याचा अंतर्भाव होता. मात्र, निधी न आल्याने यातील अनेक योजना अडचणीत आहेत. राज्य सरकारच्या हिस्स्यातील काही निधी आला असून त्यातून आरोग्य अभियान कसेबसे सुरू आहे.
सर्व शिक्षा अभियानाचीही अवस्था अशीच आहे. जानेवारी महिन्यात सर्व शिक्षा अभियानाचे बजेट तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. केंद्र सरकारने ७६ कोटींचे बजेट मंजुरही केले. मात्र, अद्याप निधी पाठविलेला नाही. यामुळे अभियानाची स्थिती नाजूक आहे. गेल्या वर्षीचा शिल्लक निधी आणि राज्य सरकारने त्यांच्या हिस्स्यातील काही निधी दिल्याने योजना मार्गी लागली आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या बीआरजीएफ योजनेचा निधी मिळालेला नाही. या योजनेत राज्यातील १२ जिल्ह्यांचा समावेश असून त्यात नगरचा समावेश आहे. यात ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या विकास कामांना निधी देण्यात येतो. जिल्ह्यासाठी या वर्षी ३८ कोटींचा निधी मंजूर असून त्यापैकी ३२ कोटींचा निधी लवकरच मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना या योजनांच्या निधीचे वितरण होताना अडचण आली नव्हती. केंद्रात सरकार बदलल्यानेच निधी वितरणात अडचण असल्याची चर्चा आहे.
पोलीस अधीक्षकांचे चौकशीचे आदेश
संगमनेर : ‘ड्यूटीवरील पोलीस अचानक बेपत्ता’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी चौकशीचे आदेश दिले.
शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल राहुल बबन यादव (रा. कारेगाव, श्रीरामपूर) हे गेल्या तीन दिवसांपासून अचानक बेपत्ता झाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली. याविषयी ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच तातडीने पोलीस अधीक्षक गौतम यांनी शहर पोलीस निरीक्षक श्याम सोमवंशी यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी यादव यांच्या विषयीचा कार्य अहवाल सादर करण्याचे फर्मान काढल्याने शहर पोलिसांची धावपळ उडाली. दरम्यान, सोमवंशी यांनी यादव यांचा कार्य अहवाल अधीक्षक गौतम यांना सादर केला. या अहवालावरून तपास केला जाणार असल्याने सत्यता समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)