अळकुटी परिसर दोन दिवसांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST2021-03-15T04:20:47+5:302021-03-15T04:20:47+5:30
अळकुटी : दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पारनेर तालुक्यातील अळकुटी परिसरातील गावे अंधारात आहेत. याचा फायदा घेत चोरांनी ...

अळकुटी परिसर दोन दिवसांपासून अंधारात
अळकुटी : दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पारनेर तालुक्यातील अळकुटी परिसरातील गावे अंधारात आहेत. याचा फायदा घेत चोरांनी दोन दुचाकींची चोरी केली.
सुभाष यशवंत पुंडे यांच्या दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या, तर अनिल गेणू परंडवाल यांची दुचाकी चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे तालुक्यातील दहा ते बारा गावे अंधारात होती. रात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे शेतीपंपाचाही वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे पिकेही पाणी असून जळत आहेत. अंधाराचा फायदा घेत शनिवारी रात्री अळकुटी-गारखिंडी रस्त्यावर सुभाष यशवंत पुंडे यांच्या दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या. अनिल गेणू परंडवाल यांची दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला.