अकोले पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बो-हाडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 14:25 IST2020-05-20T14:25:24+5:302020-05-20T14:25:38+5:30
अकोले तालुका पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय सबाजी बो-हाडे (वय ५६) यांचे बुधवारी सकाळी नाशिक येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.

अकोले पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बो-हाडे यांचे निधन
अकोले : तालुका पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय सबाजी बो-हाडे (वय ५६) यांचे बुधवारी सकाळी नाशिक येथील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले.
१७ मे २०२० रोजी रविवारी केळी, ओतूर येथे त्यांच्या स्वत:च्या शेतात विहिरीत काम सुरु असताना ते विहिरीत पडून झालेल्या जखमी झाले होते. त्यांच्या पायाला व छातीला मार लागला होता. उपचारासाठी त्यांना नाशिकला हलवले होते. उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.
तालुका पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी ७ जानेवारी २०२० ला आपल्या अंगावर गुलाल घेतला होता. भाजपकडून ते निवडून आले होते. पंचायत समितीच्या इतिहासात त्यांच्या रुपाने प्रथमच भाजपला सभापतीपदाची संधी मिळाली होती. अपघातामुळे अवघे चार महिने त्यांना सभापतीपदाची संधी मिळाली. त्यात दोन महिने लॉकडाऊनमध्ये गेले. ते धार्मिक प्रवृत्तीचे मितभाषी, शांत स्वभावाचे होते.