अजित पवारांच्या विधानाने आघाडीत संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:20 IST2021-03-18T04:20:47+5:302021-03-18T04:20:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत गंमत करणाऱ्यांकडे पाहू घेईन, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधनाने ...

Ajit Pawar's statement raises suspicions in the front | अजित पवारांच्या विधानाने आघाडीत संशयकल्लोळ

अजित पवारांच्या विधानाने आघाडीत संशयकल्लोळ

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत गंमत करणाऱ्यांकडे पाहू घेईन, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधनाने महाविकास आघाडीत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. पवार यांचा निशाण नेमका कोणावर याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रितपणे लढविली. निवडणुकीची सूत्रे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली गेली. परंतु, या पक्षाला कर्जतमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. कर्जत तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातील उमेदवार मीनाक्षी साळुंके यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे रोहित पवार हे कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. साळुंके काँग्रेसच्या असल्या तरी त्या राष्ट्रवादी पुरस्कृत होत्या. त्यांच्यामागे राष्ट्रवादीने ताकद उभी करत ४५ मतदारांना बारामतीला हलविले होते. परंतु, तरीदेखील साळुके यांना ३६ मते मिळाली. कर्जतमधील पराभव पवार यांच्या चांगलीच जिव्हारी लागलेला दिसतो. यावर भाष्य करताना पवार म्हणाले, ज्यांनी कुणी ही गंमत केली, त्यांची गंमतच करतो, असा थेट इशाराच पवार यांनी दिल्याने कर्जत तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. एवढेच बोलून पवार थांबले नाहीत तर त्यांनी प्रशांत गायकवाड यांना मिळालेल्या मतांवरही भाष्य केले. ते म्हणाले, प्रशांत गायकवाड यांच्या निवडणुकीत काही तालुक्यात गडबड झाली. ती कुणी हेही चांगले लक्षात आहे. पवार यांच्या विधानामुळे आपल्या तालुक्यातून गायकवाड यांना किती मते मिळाली, यावर चर्चा झडू लागली आहे. तालुक्यातील नेते एकमेकांकडे संशयाने पाहू लागले आहेत. तसेच काही तालुक्यात भाजपपुरस्कृत दत्ता पानसरे यांनाही जास्त मते मिळालेली आहेत. आघाडीची ताकद असताना विरोधकांना मते कशी मिळाली, याचाही हिशोब पवार यांच्याकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. नगर तालुक्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. या तालुक्यात भाजपविरोधात सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची आघाडी पूर्वीपासूनच आहे, असे असताना कमी मते कशी मिळाली, हाही प्रश्न आहेच.

...

पवार यांच्या कारवाईकडे नजरा

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा धुराळा खाली बसला असतानाच पवार यांनी गंमत करणाऱ्यांची गंमतच करतो, असे विधान करत एकप्रकारे जिल्ह्यातील नेत्यांना कारवाईचा इशाराच दिला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दगाबाजी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून पवार काय कारवाई करतात, याकडे नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Web Title: Ajit Pawar's statement raises suspicions in the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.