अजित पवारांचे- बबनराव पाचपुतेंसोबत फोटो सेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 16:26 IST2021-01-30T16:26:09+5:302021-01-30T16:26:42+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात आगमन झाल्यानंतर माजी मंत्री, भाजपाचे नेते बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले. त्यावर पवारांनी पाचपुते व भाजपाच्या कार्यकर्त्यांबरोबर फोटो सेशन केले. बबनराव, तुमची तब्येत बरी आहे ना ? काळजी घ्या असेही पवार म्हणाले.

अजित पवारांचे- बबनराव पाचपुतेंसोबत फोटो सेशन
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात आगमन झाल्यानंतर माजी मंत्री, भाजपाचे नेते बबनराव पाचपुते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले. त्यावर पवारांनी पाचपुते व भाजपाच्या कार्यकर्त्यांबरोबर फोटो सेशन केले. बबनराव, तुमची तब्येत बरी आहे ना ? काळजी घ्या असेही पवार म्हणाले.
अजित पवार व बबनराव पाचपुते यांच्यात अनेक वेळा जुगलबंदी झाली. राजकीय दरी निर्माण झाली. बऱ्याच दिवसानंतर पवार व पाचपुते यांनी होनराव चौकात झालेल्या सत्काराच्या निमित्ताने तीन मिनिटे वेळ दिला. मध्यंतरी बबनराव पाचपुते. यांना कोरोना झाला होता. त्या पाश्र्वभूमीवर अजित पवार यांनी पाचपुतेंच्या तब्येतीची अस्तेने विचारपूस केली.
त्यानंतर अजित पवार यांच्या हस्ते नगरपालिकेच्या चार कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ झाला. यावेळी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आमदार बबनराव पाचपुते. आ. संग्राम जगताप, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, बाळासाहेब महाडीक, रमेश लाढाणे, बापू गोरे, मनोहर पोटे, सुनील वाळके, सतिश मखरे, प्रशांत गोरे, अशोक खेंडके आदी उपस्थित होते.