अजिंक्य बोठे याचे एकाच वेळी तीन बँक परीक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:16 IST2021-04-03T04:16:54+5:302021-04-03T04:16:54+5:30
केडगाव : रिजनल रूरल बँक, कॅनरा बँक व युनाइटेड कमर्शियल बँक अशा तीन बँकांसाठी झालेल्या परीक्षेत अजिंक्य संजय ...

अजिंक्य बोठे याचे एकाच वेळी तीन बँक परीक्षेत यश
केडगाव : रिजनल रूरल बँक, कॅनरा बँक व युनाइटेड कमर्शियल बँक अशा तीन बँकांसाठी झालेल्या परीक्षेत अजिंक्य संजय बोठे याने तिहेरी यश संपादन केले.
राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकारी निवडीसाठी इन्स्टिट्युट ऑफ बँक पर्सोनेल सिलेक्शन या संस्थेमार्फत राष्ट्रीय पातळीवर निवड परीक्षा घेतली जाते. राष्ट्रीयीकृत बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठीच्या प्राथमिक, मुख्य आणि मुलाखत अशी तीन टप्प्यांची परीक्षा असते. राष्ट्रीय पातळीवर आयोजित केली जाणारी ही परीक्षा आयबीपीएसमार्फत घेण्यात येते. रिजनल रूलर बँक, कॅनरा बँक आणि युनायटेड कमर्शियल बँक या तीन बँकांनी घेतलेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अजिंक्य संजय बोठे याने यश संपादन करत प्रोबेशनरी ऑफिसर (क्लास वन) पद प्राप्त केले.
अजिंक्य याने विशेष प्रावीण्यासह बी.ई. मेकॅनिकल ही पदवी मिळविली आहे. अजिंक्य हा वाळकी (ता. नगर) येथील प्रगतिशील शेतकरी विलासराव बोठे यांचा पुतण्या तर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे पर्यावरण अधिकारी संजय बोठे आणि सविता बोठे यांचा सुपुत्र आहे.
---
०२ अजिंक्य बोठे