नगरजवळ स्फोट; दोन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 23:22 IST2017-10-03T23:22:03+5:302017-10-03T23:22:19+5:30

पोलिस घटनास्थळी दाखल: गॅस सिलेंडर शाबूत

ahmedngar,blast,bhingar,in,home,injuered, | नगरजवळ स्फोट; दोन गंभीर जखमी

नगरजवळ स्फोट; दोन गंभीर जखमी

मदनगर : भिंगार जवळील आलमगीर भागात एका घरात स्फोट झाल्याने दोन जण भाजले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. मंगळवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. गुडिया अजहर शेख (वय २५) आणि अजहर मंजूर शेख (वय ३०) अशी स्फोटात जखमी झालेल्यांची नावे आहेत. रात्री दहाच्या सुमारास दोघेही घरात होते. अचानक स्फोट झाल्याने घराने पेट घेतला. स्फोटाचा आवाज होताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. स्फोटामुळे घरातील साहित्य भस्मसात झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्यासह पोलीसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन बंबाने घराची आग विझवून दोघांना बाहेर काढले. घरातील गॅस सिलेंडर शाबूत राहिल्याने स्फोट हा गॅस सिलेंडरचा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बॉम्ब सदृश्य वस्तूचा स्फोट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. घटनास्थळी बॉम्बशोध पथक, श्वान पथक दाखल झाले असून कसून शोध सुरू आहे.---

Web Title: ahmedngar,blast,bhingar,in,home,injuered,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.