अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडेच : अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 13:13 IST2019-02-01T13:11:46+5:302019-02-01T13:13:56+5:30
राष्ट्रवादी-कॉँग्रेसमधील लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा जवळपास संपत आला आहे.

अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडेच : अजित पवार
अहमदनगर : राष्ट्रवादी-कॉँग्रेसमधील लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा जवळपास संपत आला आहे. त्यात अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार आहे, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नगरमध्ये स्पष्ट केले.
परिवर्तन रॅलीचा काल समारोप झाल्यानंतर शुक्रवारी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी-कॉँग्रेस आघाडीमध्ये लोकसभेच्या काही जागांवरून तिढा होता. तो जवळपास संपत आला आहे. आता केवळ चारच जागांवर निर्णय बाकी आहे. अहमदनगरच्या जागेसंदर्भातही तिढा होता. परंतु आता तो सुटला आहे. नगरची जागा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेसचे युवा नेते सुजय विखे हेही लोकसभा लढवण्यावर ठाम असल्याने आघाडीच्या उमेदवाराला फटका बसेल, असे पवार यांना विचारले असता, त्यांनी ही शक्यता फेटाळली. या जागेवर उमेदवार देण्याबाबत दोन्ही पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेणार आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार नाही, असे ते म्हणाले.