अहमदनगर जि.प. कर्मचारी सोसायटी निवडणूक : सत्ताधारी जय श्री गणेश पॅनेलची विजयाकडे घोडदौड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 13:53 IST2021-12-20T13:52:05+5:302021-12-20T13:53:06+5:30

दोन फेऱ्यांमध्ये हाती आलेल्या निकालानुसार दहा पैकी दहा जागा जिंकत सत्ताधारी जय श्री गणेश पॅनेलने विजयाकडे घोडदौड सुरू केली आहे.

Ahmednagar Z P Employees Society Election Ruling Jay Shree Ganesh Panels race for victory | अहमदनगर जि.प. कर्मचारी सोसायटी निवडणूक : सत्ताधारी जय श्री गणेश पॅनेलची विजयाकडे घोडदौड

अहमदनगर जि.प. कर्मचारी सोसायटी निवडणूक : सत्ताधारी जय श्री गणेश पॅनेलची विजयाकडे घोडदौड

अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणूक मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये हाती आलेल्या निकालानुसार दहा पैकी दहा जागा जिंकत सत्ताधारी जय श्री गणेश पॅनेलने विजयाकडे घोडदौड सुरू केली आहे. अजून अकरा जागांचा निकाल येणे बाकी आहे.

आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये सत्ताधारी जय श्री गणेश पॅनेलचे प्रमुख संजय कडूस यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने मतमोजणी झालेल्या दहा पैकी दहा जागांवर विजय मिळवला आहे. यात संजय कडूस यांनी विरोधी श्री पावन गणेश मंगलमूर्ती पॅनेलचे प्रमुख सुभाष कराळे यांचा पराभव केला.

आतापर्यंत जाहीर झालेले विजयी उमेदवार असे : 
मुख्यालय : संजय कडूस, प्रशांत मोरे, नगर तालुका - विक्रम ससे,  अकोले - विलास शेळके, संगमनेर - अरुण जोर्वेकर, श्रीरामपूर -भाऊसाहेब चांदणे, कोपरगाव - राजू दिघे, राहता- दिलीप डांगे, राहुरी - चंद्रकांत संसारे, नेवासा - ऋषिकेश बनकर, कर्जत स्वप्नील शिंदे.

Web Title: Ahmednagar Z P Employees Society Election Ruling Jay Shree Ganesh Panels race for victory