अहमदनगर : श्रीरामपुरात तरुणाची हत्या, चॉपरने वार
By शिवाजी पवार | Updated: June 9, 2023 12:11 IST2023-06-09T12:10:54+5:302023-06-09T12:11:30+5:30
दोघे मारेकरी फरार, परिसरात तणाव

अहमदनगर : श्रीरामपुरात तरुणाची हत्या, चॉपरने वार
श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील गोंधवणी रोड परिसरात मागील भांडणाच्या कारणातून झालेल्या वादात शुक्रवारी पहाटे चार वाजता दोघा जणांनी तन्वीर शाह या तरुणाची चॉपरने वार करून हत्या केली. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाळूच्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी पहाटे गोंधवणी रोड परिसरात तन्वीर शाह हा थांबलेला असताना रुपेश शिंदे, सुनिल देवकर या दोघांनी तन्वीर शाह याला अडवून शिवीगाळ केली. यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. शिंदे व देवकर यांनी शाह याच्यावर चॉपरने आठ ते दहा वार करून हत्या केली.
घटनेनंतर दोघेही मारेकरी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सध्या गोंधवणी गावात वातावरण तणावाचे झाल्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.