शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसचं इंजिन रुळावरुन घसरलं, चालकाच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 08:35 IST

भारतीय रेल्वे मार्गावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसला अहमदनगर येथे अपघात झाला.

अहमदनगर -  भारतीय रेल्वे मार्गावरीलअपघातांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसला अहमदनगर येथे अपघात झाला. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे  मोठा अनर्थ टळला. श्रीगोंद्यात रेल्वेमार्ग खचल्यानंतर मोटरमनने वेळीच ट्रेनवर नियंत्रण मिळवल्यामुळे संभाव्य अपघात टळला. त्यानंतर या मार्गावर रेल्वेचा खोळंबा झाला आहे. श्रीगोंद्यात घारगावजवळ रेल्वे मार्ग खचल्यामुळे गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसचं इंजिन रुळाला घासलं गेलं. यात रेल्वे रुळाला मोठा तडा गेला. पण चालकाने प्रसंगावधान राखत वेगावर नियंत्रण मिळवलं आणि मोठा अपघात टळला.

गुरुवारी (11 जानेवारी) दुपारी साधारण साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रुळाला तडे गेल्याने क्रेनच्या सहाय्यानं इंजिन हटवण्यात आलं, तर रेल्वेच्या डब्यांना पाठीमागून इंजिन जोडून विसापूरला आणण्यात आलं. या अपघातामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रात्री दीड वाजता खचलेला रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला आणि तडे गेलेल्या रुळावर दुसरा पर्यायी रुळ टाकल्यानंतर गोवा एक्स्प्रेस रवाना झाली.

घारगावच्या परिसरात रेल्वे मार्गावरील गेट बंद करुन बोगद्याचं काम सुरू आहे. या कामासाठी चार तासाचा ब्लॉक घेण्यात आला होता. काम झाल्यानंतर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, मात्र पटरीच्या खाली मातीचा भराव व्यवस्थित टाकण्यात आला नव्हता. त्यामुळे रेल्वे येताच वजनानं भराव खचला आणि रुळाला तडे गेले.

शेजारीच बोगद्यासाठी तब्बल 20 ते 30 फुटांचा खोल खड्डा खोदण्यात आला आहे. रेल्वेचा वेग कमी असल्यामुळे चालकानं त्वरीत परिस्थिती नियंत्रणात आणली व मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेमुळे मनमाड-दौंड मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावरील अनेक पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या.

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात