अहमदनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची एमआयआरसीला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:25+5:302021-02-06T04:37:25+5:30
अहमदनगर : यतीम खाना संचलित अहमदनगर हायस्कूल मराठीच्या विद्यार्थ्यांनी एमआयआरसीमध्ये जावून क्षेत्र भेट दिली. यावेळी विद्यालयाचे ...

अहमदनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची एमआयआरसीला भेट
अहमदनगर : यतीम खाना संचलित अहमदनगर हायस्कूल मराठीच्या विद्यार्थ्यांनी एमआयआरसीमध्ये जावून क्षेत्र भेट दिली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत चौगुले मेघा कुलकर्णी, शेख समीना, शेख नाजीया शेख इम्रान आदींसह शिक्षकउपस्थित होते.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यातील विजयाचा एमआयआरसीमध्ये सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना युद्धामध्ये वापरण्यात आलेल्या रणगाडे, रायफल, रडार, मशीनगन, रॉकेट लॉन्चर देशभक्तीपर गीत, बँडपथक या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. संस्थेचे विश्वस्त ॲड. फारूक बिलाल व अली मभाई हुंडेकरी यांनी एमआयआरसीच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.
---
फोटो ०५ निंबळक शाळा
अहमदनगर हायस्कूल मराठीच्या विद्यार्थ्यांनी एमआयआरसीमध्ये भेट दिली.