शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar Loacl Body Election Result 2025: विखे-पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; ७ नगरपरिषदांवर 'कमळ' फुलले; २ ठिकाणी धनुष्यबाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 14:23 IST

अहिल्यानगरमध्ये भाजपला सात नगरपरिषदांवर दणदणीत विजय मिळाला आहे.

Ahilyanagar Loacl Body Election Result 2025: राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाचे निकाल जाहीर झाले असून, जिल्ह्याच्या राजकारणात भाजपने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील एकूण १२ पैकी तब्बल ७ नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदावर भाजपने विजय मिळवला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने २ ठिकाणी यश मिळवले आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीमधील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. यामध्ये भाजपने सर्वाधिक ७ जागा जिंकून जिल्ह्यावर आपली पकड मजबूत केली आहे. कोपरगाव नगरपरिषदेत अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. भाजपचे पराग संधान यांनी शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत ४०९ मतांनी निसटता पण महत्त्वपूर्ण विजय मिळवला.

शिंदेसेनेचा शेवगाव-नेवासा पॅटर्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिल्ह्यात दोन ठिकाणी आपला झेंडा फडकवला आहे. शेवगाव नगरपरिषद आणि नेवासा नगरपंचायत या दोन्ही ठिकाणी शिंदेसेनेचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले असून, ग्रामीण भागात शिवसेनेने आपले अस्तित्व प्रभावीपणे दाखवून दिले आहे.

काँग्रेस आणि मविआचे बालेकिल्ले

श्रीरामपूर येथे काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखत नगराध्यक्षपद मिळवलं आहेत तर संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर शहर विकास आघाडीनेआपले वर्चस्व कायम राखत नगराध्यक्षपद राखण्यात यश मिळवले आहे. राहुरी नगरपरिषदेत मात्र महाविकास आघाडीने बाजी मारली असून, येथे आघाडीचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.

महायुतीत मैत्रीपूर्ण लढत पण भाजपच वरचढ

अहिल्यानगरमध्ये महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्र लढले होते. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत फारसे यश मिळाले नसले तरी, भाजपने सर्वाधिक ७ जागा खिशात टाकत जिल्ह्यात मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या या निकालांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी भाजपसाठी हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.

अहिल्यानगर नगराध्यक्ष यादी

१)जामखेड - प्रांजल चिंतामणी (भाजप)२) श्रीरामपूर- करण ससाने (काँग्रेस) ३) नेवासा- डॉ. करण सिंह घुले (शिवसेना शिंदे गट) ४) राहता- स्वाधीन गाडेकर (भाजप) ५) संगमनेर- डॉ. मैथिली तांबे (संगमनेर सेवा समिती)६) शिर्डी- जयश्री थोरात (भाजप) ७) श्रीगोंदा- सुनीता खेतमाळीस (भाजप) ८) पाथर्डी- अभय आव्हाड (भाजप) ९) राहुरी- भाऊसाहेब मोरे (महाविकास आघाडी)१०) शेवगाव- माया अरुण मुंडे (शिवसेना शिंदे गट)११) कोपरगाव- पराग संधान (भाजप) १२) देवळाली प्रवरा- सत्यजित कदम (भाजप)

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Dominates Ahilyanagar Local Elections; Shiv Sena, Congress Secure Seats

Web Summary : BJP secured a majority in Ahilyanagar local elections, winning 7 Nagar Parishad seats. Shinde's Shiv Sena won 2, while Congress and MVA secured one each. BJP strengthens hold despite MahaYuti contesting independently.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Ahilyanagarअहिल्यानगरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५