Ahilyanagar Loacl Body Election Result 2025: विखे-पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; ७ नगरपरिषदांवर 'कमळ' फुलले; २ ठिकाणी धनुष्यबाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 14:23 IST2025-12-21T14:22:17+5:302025-12-21T14:23:16+5:30

अहिल्यानगरमध्ये भाजपला सात नगरपरिषदांवर दणदणीत विजय मिळाला आहे.

Ahilyanagar Loacl Body Election Result 2025 BJP Wins 7 Seats Shinde Sena 2 | Ahilyanagar Loacl Body Election Result 2025: विखे-पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; ७ नगरपरिषदांवर 'कमळ' फुलले; २ ठिकाणी धनुष्यबाण

Ahilyanagar Loacl Body Election Result 2025: विखे-पाटलांच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; ७ नगरपरिषदांवर 'कमळ' फुलले; २ ठिकाणी धनुष्यबाण

Ahilyanagar Loacl Body Election Result 2025: राज्याचे लक्ष लागून असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाचे निकाल जाहीर झाले असून, जिल्ह्याच्या राजकारणात भाजपने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील एकूण १२ पैकी तब्बल ७ नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदावर भाजपने विजय मिळवला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने २ ठिकाणी यश मिळवले आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीमधील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. यामध्ये भाजपने सर्वाधिक ७ जागा जिंकून जिल्ह्यावर आपली पकड मजबूत केली आहे. कोपरगाव नगरपरिषदेत अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. भाजपचे पराग संधान यांनी शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत ४०९ मतांनी निसटता पण महत्त्वपूर्ण विजय मिळवला.

शिंदेसेनेचा शेवगाव-नेवासा पॅटर्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जिल्ह्यात दोन ठिकाणी आपला झेंडा फडकवला आहे. शेवगाव नगरपरिषद आणि नेवासा नगरपंचायत या दोन्ही ठिकाणी शिंदेसेनेचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले असून, ग्रामीण भागात शिवसेनेने आपले अस्तित्व प्रभावीपणे दाखवून दिले आहे.

काँग्रेस आणि मविआचे बालेकिल्ले

श्रीरामपूर येथे काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखत नगराध्यक्षपद मिळवलं आहेत तर संगमनेरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर शहर विकास आघाडीनेआपले वर्चस्व कायम राखत नगराध्यक्षपद राखण्यात यश मिळवले आहे. राहुरी नगरपरिषदेत मात्र महाविकास आघाडीने बाजी मारली असून, येथे आघाडीचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.

महायुतीत मैत्रीपूर्ण लढत पण भाजपच वरचढ

अहिल्यानगरमध्ये महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्र लढले होते. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत फारसे यश मिळाले नसले तरी, भाजपने सर्वाधिक ७ जागा खिशात टाकत जिल्ह्यात मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या या निकालांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी भाजपसाठी हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.

अहिल्यानगर नगराध्यक्ष यादी

१)जामखेड - प्रांजल चिंतामणी (भाजप)
२) श्रीरामपूर- करण ससाने (काँग्रेस) 
३) नेवासा- डॉ. करण सिंह घुले (शिवसेना शिंदे गट) 
४) राहता- स्वाधीन गाडेकर (भाजप) 
५) संगमनेर- डॉ. मैथिली तांबे (संगमनेर सेवा समिती)
६) शिर्डी- जयश्री थोरात (भाजप) 
७) श्रीगोंदा- सुनीता खेतमाळीस (भाजप) 
८) पाथर्डी- अभय आव्हाड (भाजप) 
९) राहुरी- भाऊसाहेब मोरे (महाविकास आघाडी)
१०) शेवगाव- माया अरुण मुंडे (शिवसेना शिंदे गट)
११) कोपरगाव- पराग संधान (भाजप) 
१२) देवळाली प्रवरा- सत्यजित कदम (भाजप)

Web Title : अहिल्यानगर स्थानीय चुनावों में बीजेपी का दबदबा; शिवसेना, कांग्रेस को सीटें

Web Summary : अहिल्यानगर स्थानीय चुनावों में बीजेपी ने बहुमत हासिल किया, 7 नगर परिषद सीटें जीतीं। शिंदे की शिवसेना ने 2 सीटें जीतीं, जबकि कांग्रेस और एमवीए ने एक-एक सीट जीती। महायुति के स्वतंत्र रूप से चुनाव लड़ने के बावजूद बीजेपी ने अपनी पकड़ मजबूत की।

Web Title : BJP Dominates Ahilyanagar Local Elections; Shiv Sena, Congress Secure Seats

Web Summary : BJP secured a majority in Ahilyanagar local elections, winning 7 Nagar Parishad seats. Shinde's Shiv Sena won 2, while Congress and MVA secured one each. BJP strengthens hold despite MahaYuti contesting independently.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.