ए.एच. पोखरणा ज्वेलर्समध्ये श्रावणानिमित्त गंठण, टेम्पल ज्वेलरी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST2021-08-12T04:25:39+5:302021-08-12T04:25:39+5:30
ए.एच. पोखरणा ज्वेलर्सच्या नवीपेठ, तसेच सर्जेपुरा येथील नवीन दालनात ही योजना लागू आहे. दोन्ही दालनांत कोरोना प्रतिबंधांचे सर्व नियम ...

ए.एच. पोखरणा ज्वेलर्समध्ये श्रावणानिमित्त गंठण, टेम्पल ज्वेलरी महोत्सव
ए.एच. पोखरणा ज्वेलर्सच्या नवीपेठ, तसेच सर्जेपुरा येथील नवीन दालनात ही योजना लागू आहे. दोन्ही दालनांत कोरोना प्रतिबंधांचे सर्व नियम पाळून, सॅनिटायझेशन, मास्कचा वापर करून ग्राहकांना सेवा दिली जात असल्याची माहिती अनिल पोखरणा यांनी दिली.
अमित पोखरणा यांनी सांगितले की, ग्राहकांना विश्वसनीय सुवर्णसेवा देत नवीपेठ येथील दालनाबरोबरच सर्जेपुरा येथील साईदीप टॉवरमध्ये प्रशस्त सुवर्णदालन सुरू केले आहे. याठिकाणी पार्किंगचीही चांगली सुविधा आहे. ग्राहकांसाठी गंठण व टेम्पल ज्वेलरी महोत्सवात अँटिक गंठण, पट्टी, राजकोट, डायमंड, मोती, काळे मणी, जेबी स्टोन, इटालियन मंगळसूत्र, तसेच टेम्पल गंठणही उपलब्ध आहे. टेम्पलमध्ये नेकलेस, कानातले, अंगठी विविध आकर्षक व सुंदर डिझाइन उपलब्ध आहेत.
आकाश पोखरणा यांनी सांगितले की, दालनातील सर्व दागिने हॉलमार्कप्रणीतच असून, सोने (दागिने) मोडताना कुठल्याही प्रकारची घट कापली जात नाही. नगर शहरात सर्वांत कमी मजुरी दरही याच दालनात आहे. (वा.प्र.)
फोटो १० पोखरणा