कृषी दूताने केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:41+5:302021-07-21T04:15:41+5:30
कोपरगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील सेवा संस्कार संस्थेच्या कृषी महाविद्यालयातील कृषी शाखेचा विद्यार्थी ...

कृषी दूताने केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कोपरगाव : महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील सेवा संस्कार संस्थेच्या कृषी महाविद्यालयातील कृषी शाखेचा विद्यार्थी कृषी दूत वैभव शांताराम सिनगर यांनी प्रात्यक्षिकांतून कोपरगाव तालुक्यातील खोपडी येथे नुकतेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कोरोना महामारीत चालू लसीकरणाची जनजागृती तसेच शेतावर जाऊन माती परीक्षण, रोपांच्या विविध कलम पद्धती, बीजप्रक्रिया, चारा प्रक्रिया, पाणी व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, फवारणी करताना घ्यावयाची काळजी संदर्भात कृषी दूत वैभव सिनगर यांनी शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन केले. याप्रसंगी गावचे माजी सदस्य विठ्ठल पंढरीनाथ नवले, निलेश नवले, मंगेश नवले यांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदविला. या उपक्रमासाठी श्रमिक उद्योग समूहाचे अध्यक्ष तसेच सेवा संस्कार संस्थेचे संस्थापक साहेबराव नवले, प्राचार्य डॉ. अशोक कडलग, डॉ. अरविंद हारदे, समन्वयक प्राध्यापक निलेश तायडे, कार्यक्रम अधिकारी निलकंठ जंजिरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
फोटो२०- शेतकरी मार्गदर्शन - कोपरगाव