कृषी कर्मचारी रस्त्यावर
By Admin | Updated: August 12, 2014 23:17 IST2014-08-12T23:09:10+5:302014-08-12T23:17:54+5:30
कोपरगाव: कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कोपरगाव तहसील कार्यालयात आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले़

कृषी कर्मचारी रस्त्यावर
कोपरगाव: कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कोपरगाव तहसील कार्यालयात आपल्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले़
कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील वेतनश्रेणी व दर्जा वाढीबाबत मंत्रिमंडळाने २००४ साली घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, कृषी विभागातील काही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय रद्द करावा, नैसर्गिक आपत्ती परिस्थितीत पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी व सहकार विभागाचा शासन निर्णय अन्वये निर्धारीत केलेल्या कार्यप्रणालीची 7अंमलबजावणी करण्यात यावी, कृषी पर्यवेक्षकांचे सर्व पदे कृषी सहाय्यकातून पदोन्नतीने भरावीत, कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांच्या प्रवास भत्त्यात वाढ करावी आदी मागण्यांसाठी कोपरगाव तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले़
आंदोलनकर्त्यांचे निवेदन तहसीलदार इंदिरा चौधरी यांनी स्वीकारले़
आंदोलनात तालुका कृषी अधिकारी विलास गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी लांगोरे, मनोज सोनवणे, सोपान राऊत, कृषी पर्यवेक्षक संजय धनकुटे, आरणे, भडांगे, गुंजाळ, कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष पी़जी़ जाधव, जिल्हा संघटनेचे सदस्य मंडलिक, अनिल वाकचौरे, महिला प्रतिनिधी सुवर्णा कोल्हे यांच्यासह २८ कृषी सहाय्यकांनी धरणे आंदोलन केले़ (तालुका प्रतिनिधी)
श्रीरामपूरला धरणे
श्रीरामपूर: कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी श्रीरामपूरच्या तहसील कार्यालयासमोर या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाचे श्रीरामपूर तालुक्यातील सदस्य तालुका कृषी अधिकारी व्ही. आर. साळवे, विजय पंडित, मनेश पंडुरे, जयंत जाधव, भागवत जोशी, भारत गुंजाळ, ए. एम. बोरसे, गणेश अंत्रे, कुमकर, पुजारी, गायकवाड, टाकसाळ, साबळे, कोरडे, वळवी, कदम, शेजूळ, धुमाळ, शेख, जाधव, जेजूरकर, गायकवाड, काळे, क्षीरसागर, धानापुरे, दहीमिवाळ, साळुंके, वाडेकर आदी अधिकारी, कर्मचारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. नायब तहसीलदार आर. टी. कांदे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. मागण्या मान्य न झाल्यास १४ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.
राहुरीत ठिय्या
राहुरी : कृषी विभागातील तांत्रिक संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांनी राहुरी येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले़ नायब तहसीलदार सुभाष कदम यांना आंदोलकांनी निवेदन सादर केले़
महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघ शाखा राहुरीच्या वतीने बेमुदत उपोषण छेडण्यात आले़ शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास मुंबई येथे आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला़आंदोलनाला राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने किरण कडू यांनी पाठिंबा व्यक्त केला़आंदोलनात राहुरी तालुका कृषी अधिकारी नामदेव रोकडे, संभाजी भिंगारदिवे, संपत कडू, गिरीष बिबवे, बाबासाहेब कोहकडे, शशिकांत दुधाडे, राजाराम दिघे, सोमनाथ बाचकर, संजय मेहेत्रे, रायभान गायकवाड, पल्लवी ढोकचवळे , राहुल क्षीरसागर, बाळकृष्ण लांबे, राजेंद्र कोहकडे आदी सहभागी झाले़
अकोले : कृषी कर्मचाऱ्यांच्या विविध १३ मागण्यांसाठी कृषी संचालकांपासून कृषी सहाय्यकापर्यंत सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारले. मंगळवारी अकोले तहसील कचेरीसमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आहे.
तालुका कृषी अधिकारी यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक, ४ मंडल कृषी अधिकारी, ९ कृषी पर्यवेक्षक, ४९ कृषी सहाय्यक धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. नायब तहसीलदार रुपेश सुराणा यांनी निवेदन स्वीकारले.
बी. बी. देशमुख, मनोज अस्वले, पंढरीनाथ घुले, सुरेश पोखरकर, अशोक धुमाळ, रावसाहेब गुंजाळ, बसवंती दातीर-आरोटे, वर्षा भारती आदींनी मनोगते व्यक्त केली. कृषिमंत्र्यांच्या मध्यस्तीने आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून सकारात्मक निर्णय घेऊ, असा शब्द मिळाला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांनी दिली.