श्रीरामपुरात कृषी सेवा केंद्रास आग; सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 17:05 IST2018-01-17T17:04:11+5:302018-01-17T17:05:35+5:30

श्रीरामपूर शहरातील शिवाजी रस्त्यावरील उंडे अ‍ॅग्रो या कृषी सेवा केंद्रास बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमार आग लागली. आगीत सुमारे २० लाख रुपये किमतीची खते व किटकनाशके जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते.

Agri Service store Fire at Shrirampur; Loss of around Rs 20 lakh | श्रीरामपुरात कृषी सेवा केंद्रास आग; सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान

श्रीरामपुरात कृषी सेवा केंद्रास आग; सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान

श्रीरामपूर : शहरातील शिवाजी रस्त्यावरील उंडे अ‍ॅग्रो या कृषी सेवा केंद्रास बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमार आग लागली. आगीत सुमारे २० लाख रुपये किमतीची खते व किटकनाशके जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचे समजते.
शिवाजी रस्त्यावरील जय भवानी चौकात हे दुकान आहे. शेतीचा हंगाम जोरात असल्याने दुकानात मोठ्या प्रमाणावर मालाची साठवणूक केलेली होती. मात्र बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे दुकानास आग लागली. आगीने थोड्याच वेळात मोठा पेट घेतला.
आसपासच्या लोकांनी तातडीने नगरपालिकेच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधला. मात्र बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत दुकानाचे मोठे नुकसान झाले होते. आगीत सुमारे १५ ते २० लाख रुपयांची किटकनाशके, खते, खाद्ये जळाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Agri Service store Fire at Shrirampur; Loss of around Rs 20 lakh