आयटकचे सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:16 IST2021-07-21T04:16:07+5:302021-07-21T04:16:07+5:30
या आंदोलनात कामगार नेते अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. बाबा आरगडे, अवतार मेहेर बाबा युनियनचे सतीश ...

आयटकचे सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन
या आंदोलनात कामगार नेते अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, भाकपचे ज्येष्ठ नेते कॉ. बाबा आरगडे, अवतार मेहेर बाबा युनियनचे सतीश पवार, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे श्याम पटारे, युवराज मोरे आदी सहभागी झाले होते.
सहायक कामगार आयुक्त कार्यालयात ग्रामपंचायत, पतसंस्था आदी विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा राहणीमान भत्ता, किमान वेतनचे दावे प्रलंबित आहेत. कोरोनाच्या नावाखाली या कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ठप्प झाले असून, कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या कार्यालयात एकूण ३२ जागा मंजूर असून, केवळ ७ कर्मचाऱ्यांवर कार्यालयाचे कामकाज चालविले जात आहे. यामुळे कामगारवर्गाचे प्रश्न सुटत नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
------------------
फोटो २० आंदोलन
ओळी- कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नसल्याने आयटक संघटनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.