खोटा गुन्हा दाखल केल्याने आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:18+5:302021-07-02T04:15:18+5:30
दुकानाचे मालक सुभाष सदाफळ हे असताना दुकान निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवल्याचे कारण देत, राहाता नगरपरिषदेने आपत्ती व्यवस्थापन ...

खोटा गुन्हा दाखल केल्याने आंदोलन
दुकानाचे मालक सुभाष सदाफळ हे असताना दुकान निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवल्याचे कारण देत, राहाता नगरपरिषदेने आपत्ती व्यवस्थापन कायदा १८८ नुसार पत्रकार संकेत अशोक सदाफळ यांचेवर गुन्हा दाखल केला. मागील काळात दिवंगत सदाफळ यांनी प्रशासनाची चुकीची धोरणे, मनमानी कारभार तसेच भ्रष्टाचाराची काही प्रकरणे वर्तमान पत्राच्या माध्यमातून मांडली होती. त्यांच्या नंतर मुलगा संकेत सदाफळ याने देखील वर्तमान पत्राच्या माध्यमातून पालिकेचा अनागोंदी कारभार दाखवण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे मनात आकस धरून राजकारण करत पालिका प्रशासनाने संकेत सदाफळ यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला़ खोटा गुन्हा त्वरित मागे घ्यावा अशी मागणी विविध पत्रकार संघटनांनी केली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगीरे, ज्येष्ठ पत्रकार सुनील दवंगे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ इलेक्ट्रॉनिक मीडिया सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भुजबळ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजकुमार जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्याशी चर्चा केली. प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन सातव यांनी यावेळी पत्रकारांना दिले.
यावेळी शिर्डी प्रेस क्लबचे अध्यक्ष हरिश दिमोटे, प्रमोद आहेर, मनोज गाडेकर, सुनील दवंगे, सचिन बनसोडे, राहाता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, दिलीप खरात, बाळासाहेब सोनावणे, बाळासाहेब नवगिरे, अनिल कोळसे, किरण शिंदे, अविनाश डोखे, राजकुमार जाधव, विनोद जवरे, अजय जाधव, महेश भालेराव, राहुल कोळगे, मोबिन खान आदी पत्रकार उपस्थित होते.