मोबाईलच्या जमान्यात ही लॅण्डलाईन, क्वाईन बॉक्सची ‘ट्रिंग ट्रिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:27 IST2021-09-09T04:27:05+5:302021-09-09T04:27:05+5:30
अहमदनगर : सध्या मोबाईलचा जमाना असला तरी अजूनही जिल्ह्यात क्वाईन बॉक्स आणि लॅण्डलाईन फोन वापरले जात आहेत. नगर जिल्ह्यात ...

मोबाईलच्या जमान्यात ही लॅण्डलाईन, क्वाईन बॉक्सची ‘ट्रिंग ट्रिंग’
अहमदनगर : सध्या मोबाईलचा जमाना असला तरी अजूनही जिल्ह्यात क्वाईन बॉक्स आणि लॅण्डलाईन फोन वापरले जात आहेत. नगर जिल्ह्यात सध्या २३ हजार ४८५ लॅण्डलाईन, तर २३५ क्वाईन बाॅक्स सुरू असून ग्राहक त्याचा वापर करत आहेत.
तंत्रज्ञानातील बदलामुळे संपर्क सेवा दिवसेंदिवस गतिमान झाली असून सध्या फोरजी-फाईव्हजीचा जमाना आहे. घरातील प्रत्येक सदस्याकडे मोबाईल अनिवार्य झाला आहे. अनेकजण अनलिमिटेड काॅलचा अनुभव घेत आहेत. त्यामुळे लॅण्डलाईन फोनची संख्या कमालीची घटली असून हॉटेल, किराणा दुकाने, औषधी दुकाने, सार्वजनिक ठिकाणी दिसणारे क्वाईन बॉक्स हद्दपार झाले आहेत. असे असले तरी जिल्ह्यात अनेक जण आजही कॉलिंग आणि ब्राॅडबँडसाठी लॅण्डलाईनचा वापर करीत आहेत.
-------------
अजूनही लॅण्डलाईनला पसंती
नगर जिल्ह्यात सध्या घरगुती व व्यावसायिक असे एकूण बीएसएनएलचे २३ हजार ४८५ लॅण्डलाईन फोन कार्यरत आहेत. अनेक जण अजून घरगुती, तसेच बँक, सरकारी कार्यालये, तसेच इतर व्यावसायिक कार्यालयात लॅण्डलाईन वापरणारे ग्राहक आहेत.
---------------
२३५ क्वाॅईन बाॅक्स
जिल्ह्यात बीएसएनएलचे ३८० पीसीओ, तर २३५ क्वाॅईन बाॅक्स आहेत. याशिवाय ६ हजार ९५० एफटीटीएफ व ८ हजार ६८२ ब्राॅडबॅण्ड कनेक्शन आहेत.
---------