पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे विश्वासघात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 11:52 IST2021-02-17T11:51:09+5:302021-02-17T11:52:05+5:30

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. १७) संगमनेर शहरातून (तीनबत्ती चौक) जाणाऱ्या कोल्हार-घोटी राज्यमार्गावर विश्वासघात आंदोलन करण्यात आले.

Against petrol, diesel and gas price hike | पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे विश्वासघात आंदोलन

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे विश्वासघात आंदोलन

संगमनेर : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. १७) संगमनेर शहरातून (तीनबत्ती चौक) जाणाऱ्या कोल्हार-घोटी राज्यमार्गावर विश्वासघात आंदोलन करण्यात आले.

    नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. देशात इंधनाची सातत्याने दरवाढ सुरू असल्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केंद्र सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

Web Title: Against petrol, diesel and gas price hike