शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षाचा विरह संपला... भेटीनंतर पती-पत्नीला अश्रू अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:26 IST

श्रीगोंदा : दीड वर्षापूर्वी ताटातूट झालेल्या पती-पत्नीची श्रीगोंद्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन भेट घडवून आणली. यावेळी झालेल्या भेटीने ...

श्रीगोंदा : दीड वर्षापूर्वी ताटातूट झालेल्या पती-पत्नीची श्रीगोंद्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन भेट घडवून आणली. यावेळी झालेल्या भेटीने या पती-पत्नीला अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांची भेट घडवून आणणारे कार्यकर्तेही गहिवरले.

उत्तर प्रदेशातील उतरौला येथील राजराणी किरसकर व तिचे पती गणेश किरसकर अशी भेट झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. श्रीगोंदा शहरातील मांडवगण रस्त्यावर राजराणी ही भटकंती करत होती. याची माहिती प्रहारचे कार्यकर्ते नितीन रोही यांना मिळाली. त्यानंतर रोही यांनी पुढाकार घेऊन राजराणीचा पती गणेश याच्याशी फोनवरून व्हिडिओ कॉल करत पत्नीची माहिती दिली. त्यानंतर दक्ष फाैंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप व नारायण ढाकणे यांनी राजराणीला दवाखान्यात अ‍ॅडमिट केले. त्यानंतर त्यांनी राजराणीला उतरौला (उत्तर प्रदेश) येथे पोहोच करण्याचे ठरविले.

पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी कायदेशीर अडचणी येऊ नयेत यासाठी उतरौला येथील पोलीस निरीक्षकांना पत्र दिले. ३२ तासांचा प्रवास करीत दत्ताजी जगताप व नारायण ढाकणे हे सामाजिक कार्यकर्ते राजराणीला घेऊन तिच्या गावी पोहोचले. तेथे गेल्यावर राजराणीने प्रथम श्रीकृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिला पाहून तिच्या मुलीने ‘मेरी माँ’ म्हणून हंबरडा फोडला. त्यावेळी पती-पत्नीची भेट झाल्यानंतर दोघांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी कार्यकर्तेही गहिवरले. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही मदत केली.

दत्ताजी जगताप व नारायण ढाकणे यांचा उतरौला येथे श्रीकृष्णाची मूर्ती भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी येथील प्रभारी पोलीस निरीक्षक पंकज सिंग त्यांच्या या कामाचे कौतुक केले.

----

०५ राजराणी

उत्तर प्रदेशातील उतरौला येथील राजराणी किरसकर व तिचे पती गणेश किरसकर यांची श्रीगोंद्यातील दत्ताजी जगताप व नारायण ढाकणे यांनी भेट घडवून आणली.