शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत पाठोपाठ जामखेड नगपरिषदेतही भाजपला धक्का; तीन सहयोगी नगरसेवक करणार राष्ट्रवादीत प्रवेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 13:20 IST

जामखेड नगरपरिषदेमध्ये भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय बुधवारी (३० सप्टेंबर) पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपला कर्जत पाठोपाठ जामखेड येथेही भाजपला गळती लागली आहे. 

जामखेड : मागील चार वर्षांपासून जामखेड नगरपरिषदेमध्ये भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय बुधवारी (३० सप्टेंबर) पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपला कर्जत पाठोपाठ जामखेड येथेही भाजपला गळती लागली आहे. 

जामखेड येथील विश्रामगृहावर प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती सुभाष आव्हाड, सूर्यकांत मोरे,  दयानंद कथले, सतिष चव्हाण, बापूराव शिंदे, अमोल जावळे, पिंटू काळे, अशोक धेंडे दादासाहेब भोरे, अमित जाधव, असिफ शेख यांच्या उपस्थितीत जामखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश निमोणकर, मोहन पवार, राजेश वाव्हळ या तिनही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. 

यावेळी  नगरसेवक महेश निमोणकर म्हणाले, मी अपक्ष निवडून येऊन भाजपला विनाशर्थ पाठिंबा दिला होता. वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी माजी मंत्री राम शिंदे यांचे काम केले होते. तरीही भाजपवाले मला त्यांचा समजत नव्हते. शहराचा खुंटलेला विकास व आ. रोहीत पवार यांनी औद्योगिक वसाहत व शहराचा करमाळा तालुक्यातील दहिगाव येथून होणारी पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी उचलले पाऊल पाहून आम्ही प्रभावीत झालो. यामुळे प्रमुख कार्यकर्ते यांच्याबरोबर चर्चा करून राष्ट्रवादीचे उदयोन्मुख नेतृत्व आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिनही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.  आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडRam Shindeराम शिंदेRohit Pawarरोहित पवारPoliticsराजकारण