शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड दुहेरी हत्याकांडानंतर पालकमंत्री राम शिंदे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 11:00 IST

जामखेड येथील दुहेरी हत्याकांडात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यासह दोघांची हत्या झाली. त्या दोघांचे मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तेथे आलेले पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना पाहून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली

ठळक मुद्देजिल्हा रूग्णालयात आले होते पालकमंत्री

अहमदनगर : जामखेड येथील दुहेरी हत्याकांडात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यासह दोघांची हत्या झाली. त्या दोघांचे मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तेथे आलेले पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना पाहून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे तणाव वाढला असून पोलिसांनी रुग्णालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.जामखेड ग्रामीण रुग्णालयातून दोन्ही मृतदेह नगरमधील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. त्यावेळी तेथे मोठी गर्दी झाली होती. मृतदेहाची तपासणी करून ते जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्याची माहिती पालकमंत्री राम शिंदे यांना मिळताच तेही तिथे दाखल झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात मोठा पोलीस फौजफाटा बोलविण्यात आला. पोलिसांनी चोहोबाजुंनी रुग्णालयाला घेराव घातला आणि सर्व दरवाजे बंद केले. त्यानंतर राम शिंदे यांनी प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांचा रोष पाहता दवाखान्याच्या पाठीमागील दाराने काढता पाय घेतला.जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस उपाधिक्षक अरुण जगताप, पोलीस निरीक्षक माशाळकर, सुरेश सपकाळे, सहायक निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह शंभराहुन अधिक पोलिसांचा बंदोबस्त होता. रात्री उशिरापर्यंत दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयातच होते. जामखेड येथील हत्याकांडाच्या घटनेने शहरात तणाव निर्माण झाला. कापडबाजारात काही तरुणांनी घुसून दुकाने, रस्त्यावरील हातगाड्या बंद करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, उपाधिक्षक सुदर्शन मुंडे यांनी रात्री घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडPoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेस