विसापूर कारागृहातील कैद्यांचे आरोग्य वा-यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 16:33 IST2018-04-16T16:32:47+5:302018-04-16T16:33:40+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जिल्हा कारागृहात १०९ कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात आरोग्य अधिका-यांचे पद जिल्हा आरोग्य संचालनालयाने भरले नसल्याने येथील कैद्यांची आरोग्य धोक्यात आले आहे.

विसापूर कारागृहातील कैद्यांचे आरोग्य वा-यावर
नानासाहेब जठार
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जिल्हा कारागृहात १०९ कैदी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात आरोग्य अधिका-यांचे पद जिल्हा आरोग्य संचालनालयाने भरले नसल्याने येथील कैद्यांची आरोग्य धोक्यात आले आहे.
विशेष म्हणजे विसापूर कारागृहाला २०१३ साली खुल्या कारागृहाचा दर्जा मिळाला. त्यापूर्वी कारागृहात काही वेळा दहा-बारा कैदी व पस्तीस कर्मचारी अशी अवस्था असताना पूर्णवेळ आरोग्य अधिका-यांची नेमणूक होती. त्यानंतर खुल्या कारागृहाचा दर्जा मिळाल्यानंतर दरम्यानचे काळात विसापूर कारागृह व भिक्षेकरीगृहांमध्ये संयुक्त आरोग्य अधिकारी नियुक्तीस होते. आता मात्र काही दिवसांपासून आरोग्य अधिक-यांची नियुक्तीच आरोग्य संचानालयाकडून झाली नाही. आरोग्य अधिकारी नसताना मात्र कारागृहात सरकारी औषधालय चालू आहे.त्या औषधालयात केमिस्ट व ड्रगीस्ट पदावर संतोष भोर हे कर्मचारी नियुक्त आहेत. ते व कारागृहातील हवलदार उदयभान खेडकर हे कैद्यांना प्रथमोपचार करतात. खेडकर यापूर्वी येरवडा कारागृहात असताना आरोग्य अधिक-यांचे मदतनीस म्हणून काम केल्याचे अनुभवाचा ते उपयोग करतात. एखाद्या कैदी गंभीर आजारी असल्यास त्याला नगरला जिल्हा रुग्णालयात पाठवले जाते. तरी ही बाब कैद्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकेदायक आहे. एखादा कैदी गंभीर आजारी पडला व त्याचेवर योग्यवेळेत रास्त प्रथमोपचार झाले नाही तर त्याचे काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आहे. कारागृह प्रशासनाने व जिल्हा आरोग्य विभागाने आरोग्य अधिकारी मिळावा यासाठी पाठपुरावा करुनही आरोग्य अधिकांयाची नियुक्ती होत नाही.
आठवड्यातून एकदा कैद्यांची आरोग्य तपासणी
कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सांगीतले की, कारागृहास स्वतंत्र आरोग्य आधिकारी नियुक्त गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. गाडे यांनी ही पाठपुरावा केला. परंतु आरोग्य संचालयाकडून अद्याप यापदाची नियुक्ती झाली नाही. आरोग्य विभागाने पिंपळगावपिसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बोठे यांना आठवड्यातून एका दिवशी एक तास कारागृहातील कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी नियुक्ती केली आहे. कारागृहास आरोग्य अधिकारी नसतानाही कैद्यांच्या आजारपणाबाबत योग्य काळजी घेण्यात येते. वेळप्रसंगी नगरचे जिल्हा रुग्णालयात रुग्ण कैदी पाठवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.