शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकनंतर आता ट्विटर, इंस्टाग्रामवरही बनावट खाती;  महिला, मुलींनो काळजी घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:35 IST

संगमनेर : समाजमाध्यमांवर बनावट खाती उघडून त्याद्वारे पैश्यांची मागणी करणे, फसवणूक होणे, महिला, मुलींना अश्लील संदेश पाठविणे अशा अनेक घटना घडल्या आहेत, घडत आहेत. फेसबुकनंतर आता ट्विटर, इंस्टाग्रामवरही बनावट खाती उघडल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ट्विटर, इंस्टाग्रामवर खाते असलेल्यांनी विशेष करून महिला व मुलींनी काय काळजी घ्यावी. या संदर्भाने सायबर सुरक्षा तज्ज्ञ, विश्लेषक ओंकार गंधे यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद. 

शेखर पानसरे   

प्रश्न : समाजमाध्यमांवर बनावट खाती उघडणा-यांचा हेतू काय असतो?  

गंधे : पूर्वी फेसबुकवर बनावट खाती उघडली जायची. आता ती ट्विटर, इंस्टाग्रामवरही उघडली जात आहेत. बनावट खाती उघडून संबंधित व्यक्तीचे मित्र, मैत्रीण, नातेवाईक यांना खोट्या खात्यात जोडले जाते. त्यानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते. काही सॉफ्टवेअरचा वापर करून फोटो, व्हिडिओमध्ये बदल केला जातो. खोट्या खात्यांवर त्या व्यक्तीच्या नावाने अश्लील फोटो, संदेश टाकले जातात. हे फोटो, व्हिडिओ अगदी हुबेहुब वाटतात. त्यामुळे बदनामी होते. वेगवेगळे हेतू ठेवून बनावट खाती उघडली जातात. हे सायबर पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

प्रश्न : बनावट खात कसे तयार केले जाते?

गंधे : लॉकडाऊन काळात अनेकांचे ट्विटर, इंस्टाग्रामवरही बनावट खाती उघडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अनेक खातेधारक असेही आहेत की त्यांचे खाते अगदी हुबेहुब तयार केले गेले. त्यावरील फोटो, ट्विट कॉपी करून नवीन खाते त्याच नावाने सुरू करण्यात आले. काही जणांचे ट्विटरवर खातेही नसते. त्यांचे फेसबुकवरील फोटो, पोस्ट कॉपी करत बनावट खाती तयार केली जातात.

प्रश्न : बनावट खाते कसे ओळखता येईल?

गंधे : बनावट खाते ओळण्यासाठी दोनच गोष्टी आहेत. पहिली गोष्टी, यामध्ये खातेधारकाला आपले बनावट खाते उघडल्याचे निर्देशनास आले तर बनावट खाते उघडल्याचे समोर येवू शकते. दुसरी गोष्ट, एकाच व्यक्तीचे दोन खाते असल्याने त्या व्यक्तीचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्यात संभ्रम निर्माण होतील. तेव्हा त्यांनी इतर माध्यमांच्याद्वारे त्या व्यक्तीशी संपर्क करावा. समाज माध्यमांवर खाती नसलेल्यांची देखील खोटी खाती ख-या नवाने उघडली जातात. त्यावर व्हाट्सअप किंवा इतर माध्यमातून चोरलेले फोटो टाकले जातात.

प्रश्न : समाजमाध्यमांवर खाते असलेल्यांनी काय काळजी घ्यावी?

गंधे : सायबर गुन्ह्यात गुन्ह्यांचे स्वरूप बदलते असते. समाजमाध्यमांवरील खात्यावर आपण फोटो किंवा माहिती टाकतो, ती सायबर चोरट्यांकडून चोरली जाते. समाजमाध्यमांवर खाती उडताना आपल्याकडील मोबाईल क्रमांक खात्याला जोडावा. त्यामुळे कुणीही खात्यामध्ये छेडछाड केल्यानंतर तो संदेश आपल्या मोबाईलवर येतो. खोटे खाते उघडलेले असेल तर ते खाते बंद करण्यासाठी आणि आपले खरे खाते टिकून राहण्यासाठी मोबाईल क्रमांकाचा वापर होतो. मात्र, महिला व मुलींनी आपला मोबाईल क्रमांक खात्याला कुणालाही दिसणार असे करता येवू शकते बनावट खात्यासंदर्भाने सायबर पोलिसांशी संपर्क करत तक्रार करावी. हे गरजेचे आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडियाinterviewमुलाखत