शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

७० दिवसांच्या मुक्कामानंतर छावणीला ‘बाय-बाय’ : पावसाची जोरदार सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 17:44 IST

तब्बल ७० दिवस घरापासून दूर, घरच्या मायेला पारखी झालेली आणि छावणीतच कसा बसा आपला संसार मांडलेल्या जनावरांना आता घरची ओढ लागली आहे

योगेश गुंडकेडगाव : तब्बल ७० दिवस घरापासून दूर, घरच्या मायेला पारखी झालेली आणि छावणीतच कसा बसा आपला संसार मांडलेल्या जनावरांना आता घरची ओढ लागली आहे. नगर तालुक्यात काही गावात जोरदार पावसाने सलामी दिल्याने अनेक छावण्यांचे नुकसान झाले. छप्पर वारा आणि पावसाने हिरावून घेतले. यामुळे बु-हाणनगर परिसरातील अनेक जनावरांचा आपल्या घराकडे परतीचा प्रवास सुरु झाला आहे. आज तालुक्यातील पूर्व भागातील बु-हाणनगर, कापूरवाडी, सारोळाबद्धी, चिचोंडी पाटील भातोडी, मदडगाव, मेहेकरी परिसरातील गावांना पावसाने जोरदार सलामी दिली. जवळपास तासभर धुव्वाधार पावसाच्या सरी कोसळल्या.नगर तालुक्यात १ एप्रिल पासून छावण्या सुरु झाल्या. तालुक्यात जवळपास ६६ छावण्यामध्ये ७० हजार जनावरे आहेत. रविवारी वाळकी परिसर सोडून तालुक्यात कुठेच जास्त पाउस झाला नाही. आज मात्र तालुक्यातील पूर्व भागात पावसाचे जोरदार आगमन झाल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. तालुक्यातील बु-हाणनगर येथे दुपारी जोरदार पाऊस आणि वारा सुरु झाला. यामुळे जनावरांच्या छावणीचे नुकसान झाले. शेतक-यांची मोठी धावपळ झाली. शेतक-यांनी लगेच आपली जनावरे आपल्या घरी नेण्याची तयारी सुरु केली. पावसाच्या आगमनानंतर तब्बल ७० दिवस छावणीतील आपला मुक्काम संपून जनावरांचा आपल्या घराकडे प्रवास सुरु झाला.कधी पाउस येईल आणि कधी घरातील हक्काचा चारा मिळेल याची आस जनावरांनाही लागली असावी म्हणूनच घरच्या ओढीने जनावरांची पावले घराकडे परतताना आनंदली होती. घराकडे जाताना मात्र छावणीत घालवलेली ७० दिवसांची आठवण मुके जनावरे आपल्या स्मृतीत ठेऊन छावणीतून घराकडे परतत होती. छावणीतील भजन, कीर्तन, काही सांस्कृतिक कार्यक्रम गावातील लोकांनी आपल्या मुक्या जनावरांसोबत साजरे केले. त्याची मात्र आता फक्त आठवणी मुक्या जनावरांच्या मनात राहिल्या.शेतात पाणी साचल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले होते. ज्या गावात जोरदार पाऊस कोसळला त्या ठिकाणचे छावणीतील जनावरेही आता परतीच्या प्रवासला निघण्याची तयारी करीत आहेत. तालुक्यातील जेऊर परिसर, वाळकी परिसर, सारोळा कासार परिसर, निंबळक, हिंगणगाव, टाकळी खातगाव जखणगाव आदि भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतक-यांना आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय