प्रगत विद्यालय व वि. ल. कुलकर्णी प्राथमिक शाळेत योग दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:15 IST2021-06-22T04:15:22+5:302021-06-22T04:15:22+5:30
हा कार्यक्रम जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या अध्यक्षतेखाली, तर आर्ट ॲाफ लिव्हिंगच्या डॉ. अर्चना पतंगे, प्राचार्य सुनील ...

प्रगत विद्यालय व वि. ल. कुलकर्णी प्राथमिक शाळेत योग दिन
हा कार्यक्रम जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या अध्यक्षतेखाली, तर आर्ट ॲाफ लिव्हिंगच्या डॉ. अर्चना पतंगे, प्राचार्य सुनील पंडित, मुख्याध्यापिका प्रतिभा धरम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. डॉ. पतंगे यांनी ॲानलाईन पहिली ते बारावीतील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना योग प्राणायामचे प्रात्यक्षिक दाखवले. सुहास मुळे म्हणाले की, जगात शांती, आरोग्य आणि सुसंवाद नांदावा म्हणून स्वतः कुटुंब, कार्यालय आणि समाजाप्रती कर्तव्य निभावण्यासाठी कटिबद्ध आहे. अशा प्रकारचा संकल्प प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकांनी करावा.
प्रास्ताविक प्राचार्य सुनील पंडित यांनी केले, तर आभार मुख्याध्यापिका प्रतिभा धरम यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक हे मोठ्या संख्येने ऑनलाईन सहभागी झाले होते.
----------
फोटो - २० प्रगत विद्यालय
आर्ट ॲाफ लिव्हिंगच्या डॉ. अर्चना पतंगे यांनी प्रगत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले.