पॉलिटेक्निकचे प्रवेश ११ डिसेंबरपासून
By | Updated: December 6, 2020 04:21 IST2020-12-06T04:21:29+5:302020-12-06T04:21:29+5:30
अहमदनगर : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीचे (पॉलिटेक्निक) प्रवेश ११ डिसेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य मुकुंद सातारकर ...

पॉलिटेक्निकचे प्रवेश ११ डिसेंबरपासून
अहमदनगर : प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकीचे (पॉलिटेक्निक) प्रवेश ११ डिसेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य मुकुंद सातारकर यांनी दिली.
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश लांबले होते; परंतु आता प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. चालू वर्षी प्रवेशाच्या फक्त दोनच फेऱ्या होणार आहेत. ११ डिसेंबर रोजी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीसाठी जागांची यादी जाहीर केली जाणार आहे. पसंतीक्रम देण्यासाठी १२ ते १४ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. १६ डिसेंबर रोजी पहिल्या फेरीचे जागा वाटप केले जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांनी १७ ते १८ डिसेंबरदरम्यान ऑनलाईन स्वीकृतीसाठी, तर प्रत्यक्ष प्रवेशासाठी १७ ते १९ डिसेंबरपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा. दुसऱ्या फेरीसाठी २० डिसेंबर रोजी रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार आहे. २१ ते २२ डिसेंबर रोजी पर्याय नोंदणी, तर २४ डिसेंबर रोजी निवड यादी जाहीर होणार आहे. २५ ते २८ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन स्वीकृती, तर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया २५ ते २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. दरम्यान, २१ डिसेंबरपासून महाविद्यालयातील शैक्षणिक काम करण्यास सुरुवात होईल. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी डीटीईच्या संकेतस्थळाला अथवा शासकीय तंत्रनिकेतनमधील सुविधा केंद्राशी संपर्क करावा, असे आवाहन प्राचार्य सातारकर यांनी केले आहे.