आदिवासींचा लाँगमार्च
By Admin | Updated: August 12, 2014 23:17 IST2014-08-12T23:07:34+5:302014-08-12T23:17:46+5:30
अकोले : माकपच्या वतीने श्रमिक आदिवासी कष्टकऱ्यांनी शिदवड ते अकोले १५ किलोमीटरचा ‘लाँग मार्च’ काढून तहसील कार्यालयावर निदर्शने केली.

आदिवासींचा लाँगमार्च
अकोले : माकपच्या वतीने श्रमिक आदिवासी कष्टकऱ्यांनी शिदवड ते अकोले १५ किलोमीटरचा ‘लाँग मार्च’ काढून तहसील कार्यालयावर निदर्शने केली. पदयात्रेत जवळपास दीड हजार आदिवासी सहभागी झाले होते.
आदिवासी ठाकरवाड्यांना जाणीवपूर्वक विकासापासून दूर ठेवण्याचे काम येथील सत्ताधाऱ्यांनी केले. ६८ वर्षे झाले, तरीही अजून जातीचे दाखले आदिवासी कष्टकऱ्यांना मिळाले नाहीत. किचकट अटी पुढे करुन आदिवासी ठाकर समाजाला आरक्षणाच्या फायद्यापासून दूर ठेवले जात आहे. काही गावांना आदिवासी उपयोजनेतून वगळण्यात आले आहे, असा आरोप करत, श्रमिकांच्या मुलभूत प्रश्नांकडे लोकप्रतिनीधींनी तातडीने लक्ष न दिल्यास मंञ्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा माकप किसान सभेच्या वतीने डॉ. अजित नवले यांनी दिला.
सर्व आदिवासींना वाडीवस्तीत जाऊन जातीचे दाखले द्या, आदिवासी उपयोजनेचे लाभ मिळण्यासाठी सर्व ठाकरवाड्यांना आदिवासी गावाचा दर्जा द्या, कोकणात इको सेन्सिटिव्ह झोन मधून ८९६ गावे वगळली त्या प्रमाणे तालुक्यातील ४२ गावे झोनमुक्त करा, ठाकरवाड्यांचे रस्ते, वनजमिन वाहूदारांच्या नावे पीक पाहणी आदींसह १६ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, डॉ. अजित नवले यांनी लॉंग मार्चचे नेतृत्व केले. दोन दिवस अकोले लाल बावट्याच्या जय घोषाणे दणाणले. पदयाञेत सहभागी झालेले आदिवासी आंदोलकांनी अकोल्यातच मुक्काम ठोकला. आंदोलकांची घणाघाती भाषणे झाली. ठाकर वाडी वस्त्यांना व पठारभागातील आदिवासींना विकासापासून वंचित ठेवल्याचा रोष भाषणांनमधून व्यक्त करत लोकप्रतिनीधींचे नाव घेऊन टीकास्ञ सोडले.
(तालुका प्रतिनिधी)