'मला आदित्यच म्हणत जा, साहेब वगैरे म्हणू नका!'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 13:30 IST2020-01-17T13:23:21+5:302020-01-17T13:30:33+5:30
माझा उल्लेख आदित्य साहेब असा करण्यात येतो. प्रोटोकॉल जरी लागू झाला असला तरी मी प्रत्येक माणसाला सांगतो.

'मला आदित्यच म्हणत जा, साहेब वगैरे म्हणू नका!'
अहमदनगरः माझा उल्लेख आदित्य साहेब असा करण्यात येतो. प्रोटोकॉल जरी लागू झाला असला तरी मी प्रत्येक माणसाला सांगतो. मला आदित्यच म्हणत जा, साहेब वगैरे म्हणू नका, असं आदित्य ठाकरे उपस्थितांना म्हणाले आहेत. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-2020 युवा संस्कृतीत महोत्सवात संबोधित केले. या कार्यक्रमात मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आदित्य ठाकरे बोलत होते.
माझ्या आजोबांनी नेहमी सांगितलंय आणि वडीलही सांगत असतात. कुठलाही प्रोटोकॉल लागू झाला तरी स्वतःचं जगणं आणि राहणीमान बदलू नकोस. त्यामुळे मला आदित्य म्हणत जा, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तत्पूर्वी ते म्हणाले, नवीन दशक, नवीन वर्ष सुरू झालेलं असल्यानं मी सर्वांनाच शुभेच्छा देतो. हे महाविकास आघाडीचं नवीन दशक सुरू झालं आहे. या महाविकास आघाडीमध्ये जास्तीत जास्त तरुण आमदार आहेत.
आम्ही तरुण आमदार एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी काही तरी करू इच्छितो. ज्या ज्या मिनिटाला जे गरजेचं असतं, ते केलं पाहिजे. टेन्शन बाजूला सोडून मजा करणं गरजेचं आहे. मी अनेक फेस्टिव्हल पाहिले, पण थोडं वेगळं आहे. युवा पिढी मनातले प्रश्न विचारलाय लागली आहे. आधी मंत्री, नेते समोर असल्यावर तरुणांवर थोडं दडपण असायचं. शपथविधीसाठी आईचं नाव घेणं हा माझ्यासाठी मोठा क्षण होता, याचीही आठवण त्यांनी करून दिली आहे.