आदित्य शिंदेची राज्य कबड्डी संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:19 IST2021-03-22T04:19:35+5:302021-03-22T04:19:35+5:30

श्रीगोंदा : भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या विद्यमाने सूर्यपेठ येथे आयोजित केलेेल्या ४७ व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी ...

Aditya Shinde selected in the state kabaddi team | आदित्य शिंदेची राज्य कबड्डी संघात निवड

आदित्य शिंदेची राज्य कबड्डी संघात निवड

श्रीगोंदा : भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या विद्यमाने सूर्यपेठ येथे आयोजित केलेेल्या ४७ व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी कामठी येथील आदित्य तुुषार शिंदे याची महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संंघात निवड झाली आहे.

आदित्य कबड्डीत डाव्या बाजूने उभे राहून उत्कृष्ट चढाई करणारा खेळाडू आहे. आदित्य हा नेवासा येथील त्रिमूर्ती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. श्रीगोंदा येथील मिशन गर्ल स्कूलमधील शिक्षक तुषार शिंदे यांचा तो मुलगा आहे. त्याला संस्थेच्या अध्यक्ष सुमती घाडगे, संस्थेच्या उपाध्यक्ष स्नेहल घाडगे, संस्थेचे सचिव मनीष घाडगे, प्राचार्य सोपान काळे, क्रीडा समन्वयक चौहान, त्रिमूर्ती कबड्डी अकादमीचे प्रशिक्षक गणेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

---

२१ आदित्य शिंदे

Web Title: Aditya Shinde selected in the state kabaddi team