पुणतांबा येथील आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 14:56 IST2020-05-15T14:56:19+5:302020-05-15T14:56:28+5:30

राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे दरवषी आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळा मुक्ताई मंदिर येथे मठाधिपती स्वामी रामानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जातो. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदाचा सोहळा रद्द करण्यात आला आहे.

Adishakti Muktai Samadhi ceremony at Puntamba canceled | पुणतांबा येथील आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळा रद्द

पुणतांबा येथील आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळा रद्द

पुणतांबा : राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे दरवषी आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळा मुक्ताई मंदिर येथे मठाधिपती स्वामी रामानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला जातो. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदाचा सोहळा रद्द करण्यात आला आहे.
आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळ्यास पुणतांबा, राहाता, शिर्डी, पिंपळवाडी, येवला, कोपरगाव, वैजापूर येथून अनेक भक्तगण येत असतात. कोरोनामुळे संभाव्य गर्दी टाळण्यासाठी म्हणून १७ मे रोजीचा आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळा रद्द करण्यात आला आहे. यादिवशी फक्त सकाळी आरती, अभिषेक करण्यात येईल. भाविकांनी पुणतांबा येथे येण्याची तसदी घेऊ नये. घरातच राहून आदिशक्ती मुक्ताई समाधी सोहळा साजरा करण्याचे आवाहन स्वामी रामानंदगिरीजी महाराज यांनी भाविकांना केले आहे.
 

Web Title: Adishakti Muktai Samadhi ceremony at Puntamba canceled