शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
6
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
7
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
8
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
9
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
10
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
11
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
12
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
13
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
14
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
15
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
16
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
17
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
18
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
19
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
20
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णांकडून ८५ लाखांची जास्तीची रक्कम वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील रुग्णालयांनी कोविड रुग्णांकडून ८५ लाख रुपये जास्तीचे आकारल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शहरातील रुग्णालयांनी कोविड रुग्णांकडून ८५ लाख रुपये जास्तीचे आकारल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी केलेल्या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली. दरम्यान, रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या आयुक्तांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

कोविड रुग्णांना जास्तीची रक्कम परत करण्याच्या मागणीसाठी मनसचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी बुधवारी दुपारी महापालिकेत आले. आयुक्त हे दालनात उपस्थित नव्हते. ते शेजारीच असलेल्या सभागृहात होते. मनसेचे पदाधिकारी सभागृहात येऊन धडकले. फरशीवर पोते टाकून काही पदाधिकारी त्यावर झोपले. यावेळी सचिन डफळ, अनिता दिघे, नितीन भुतारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयांवर कारवाई करण्याचे लेखी द्या, त्यानंतरच आम्ही उठू, असा इशारा दिला. त्यावर रुग्णालयांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंबई नर्सिंग होम कायद्यानुसार रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत, असे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी सांगितले. मात्र, आंदोलनकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी ज्या रुग्णालयांनी जास्तीची रक्कम परत केली नाही, अशा रुग्णालयांची नावे जाहीर करण्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांची मागणी मान्य करीत आयुक्तांनी वैद्यकीय आराेग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना रुग्णालयांची यादी आंदोलनकर्त्यांना देण्याचा आदेश दिला. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

...

कोविड रुग्णांना जोपर्यंत पैसे परत मिळत नाहीत, तोपर्यंत मनसेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येईल. रुग्णालयांनी गोरगरीब रुग्णांना त्यांचे पैसे परत करावेत; अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल.

-नितीन भुतारे, मनसे

..

सूचना फोटो आहे.