जिल्ह्यात ४६० बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:40+5:302021-07-20T04:16:40+5:30
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ०२, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २१४ आणि अँटिजेन चाचणीत २४४ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा ...

जिल्ह्यात ४६० बाधितांची भर
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ०२, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २१४ आणि अँटिजेन चाचणीत २४४ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये पाथर्डी १ आणि श्रीगोंदा १ अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर १०, अकोले २, जामखेड ४१, कर्जत १०, कोपरगाव १६, नगर ग्रामीण ३, नेवासा १८, पारनेर १०, पाथर्डी ६, राहता ६, राहुरी १०, संगमनेर २१, शेवगाव ३६, श्रीगोंदा ५, श्रीरामपूर १८, कंटोनमेंट बोर्ड १ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत २४४ जण बाधित आढळून आले. त्यामध्ये नगर शहर १, अकोले ४, जामखेड १५, कर्जत ३९, कोपरगाव ०९, नगर ग्रामीण ०३, नेवासा २१, पारनेर ७१, पाथर्डी ३२, राहता ०२, राहुरी ०६, संगमनेर ०७, शेवगाव ०७, श्रीगोंदा २५ आणि श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.