कलाकारांची फसवणुक करणा-यांवर वचक बसला - अभिनेते प्रकाश धोत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 16:27 IST2018-05-18T16:25:52+5:302018-05-18T16:27:34+5:30
चित्रपट महामंडळ कलाकारांचे प्रश्न सोडवत असून सहकार्य करत आहे, त्यामुळे भविष्यात प्रत्येक कलाकाराने चित्रपट महामंडळाचे सदस्य असणे आवश्यक आहे.

कलाकारांची फसवणुक करणा-यांवर वचक बसला - अभिनेते प्रकाश धोत्रे
अहमदनगर : चित्रपट महामंडळ कलाकारांचे प्रश्न सोडवत असून सहकार्य करत आहे, त्यामुळे भविष्यात प्रत्येक कलाकाराने चित्रपट महामंडळाचे सदस्य असणे आवश्यक आहे. फेक आॅडिशनमुळे कलाकारांची सातत्याने फसवणुक व्हायची, मात्र चित्रपट महामंडळाने घेतलेल्या कडक भुमिकेमुळे कलाकारांची फसवणुक करणा-यांवर चांगला वचक बसला आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेते प्रकाश धोत्रे यांनी केले.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नगर विभागाच्यावतीने नव्याने सदस्य नोंदणी झालेल्या सभासदांना ओळखपत्र वितरण सोहळा अभिनेते प्रकाश धोत्रे, ज्येष्ठ रंगकर्मी पी.डी.कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धोत्रे बोलत होते.
सतीश शिंगटे म्हणाले, संपूर्ण राज्यात चित्रपट महामंडळ राजकारण विरहित काम करत आहे. रंगभुमीवर बरोबरच विविध टिव्ही मालिकांमध्येही नगरच्या कलाकारांना मोठ्या प्रमाणात भुमिका करण्याची संधी मिळत आहे. पी.डी.कुलकर्णी म्हणाले, नगर जिल्ह्यामध्ये आता चित्रपट उद्योग वाढत आहे. त्यामुळे कलाकारांनाही नवनवीन संधी उपलब्ध होत आहे. चित्रपट महामंडळाच्या माध्यमातूनही टीव्ही मालिका, चित्रपट निर्मिती नगरमध्ये होत असल्याने जिल्ह्यात सांस्कृतीक क्षेत्र वाढत आहे.